KL Rahul Athiya Shetty Wedding: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारी रोजी पार पडला. सुनील शेट्टीच्या (Suniel Shetty) खंडाळ्यातील फार्महाऊसवर दाक्षिणात्य पद्धतीने केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्न केलं आहे. लग्नसोहळ्यासाठी अथिया आणि केएल राहुल यांनी रॉयल लूक केला होता. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. अनेकांनी अथिया आणि केएल राहुल यांना कोट्यवधी किंमतीच्या भेटवस्तू दिल्याची चर्चा आहे. पण राहुल आणि आथिया यांच्या कुटुंबाकडून याबाबत दुजोरा दिलेला नाही...
सुनिल शेट्टीनं दिला फ्लॅट तर सलमान खाननं दिलं 'हे' गिफ्ट
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तसेच मित्रमैत्रिणींनी खास भेटवस्तू दिल्याचं समजतेय. अभिनेता सुनिल शेट्टीनं त्याच्या लेकीला आणि जावयाला 50 कोटींचा आलिशान फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला आहे. तर अभिनेता सलमान खाननं अथिया आणि राहुल यांना 1.64 कोटींची ऑडी गाडी भेटवस्तू म्हणून दिली. सुनिल शेट्टीचा मित्र अभिनेता जॅकी श्रॉफ यानं अथिया आणि राहुल यांना 30 लाखांचे खड्याळ दिले तर अभिनेता अर्जुन कपूरनं 1.5 कोटींचे डायमंड ब्रेसलेट अथिया आणि राहुलला दिल्याची चर्चा आहे.
'या' क्रिकेटर्सनं दिलं खास गिफ्ट
अथिया आणि केएल राहुल यांना क्रिकेटर विराट कोहलीनं 2.17 कोटींची बीएमडब्ल्यू गाडी दिली. तर महेंद्र सिंह धोनीनं त्यांना 80 लाखांची निंजा कवास्की बाइक दिल्याचं समजतेय.
अथिया आणि केएल राहुल 100 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नसोहळ्यासाठी अथियानं खास लूक केला होता. अथियानं विवाह सोहळ्यात पिंक लेहंगा परिधान केला होता. तसेच तिनं स्टोनचा चोकर नेकलेस, बिंदी, झुमके आणि बांगड्या या ज्वेलरी लग्नात परिधान केल्या होत्या. अथियाचा हा लेहंगा अनामिका खन्ना यांनी डिझाइन केला होता. एका मुलाखतीमध्ये अनामिका खन्नानं सांगितलं की, हा लेहंगा तयार करायला तिला 10,000 तास लागले.
अथियाने 2015 मध्ये अॅक्शन फिल्म 'हिरो' मधून बॉलिवूमध्ये पदार्पण केले होते. ‘मुबारकान’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्ये आथियाने महत्वाची भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: