Wriddhiman Saha: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. तीन किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला घरच्या मैदानावर अशा पराभवाचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात टीम इंडियाला चौथ्या डावात 147 धावांचे लक्ष्य होते, मात्र भारताचा संपूर्ण संघ 121 धावांवरच मर्यादित राहिला. 


न्यूझीलंडविरुद्धची मालिका संपताच भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याने सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामानंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. बंगालकडून खेळणाऱ्या रिद्धिमान साहाने आपल्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे म्हटले आहे. 40 वर्षीय रिद्धिमान साहाने 2010 मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. रिद्धिमान साहा 2021 पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. रिद्धिमान साहाने आयपीएलच्या मेगा लिलावासाठी आपले नाव दिलेले नाही. त्यामुळे रिद्धिमान साहा आयपीएल 2025 मध्येच सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. 






रिद्धिमान साहाने सोशल मीडियावर केली पोस्ट-


बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रिद्धिमान साहाने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. 'क्रिकेटमधील एका सुंदर प्रवासानंतर, हा हंगाम माझा शेवटचा असेल. बंगालचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला आहे, मी निवृत्त होण्यापूर्वी फक्त रणजी ट्रॉफी खेळणार आहे. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार..., असं रिद्धिमान साहाने पोस्टद्वारे म्हटलं आहे.






रिद्धिमान साहाची कारकीर्द-


रिद्धिमान साहाने भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत 1353 धावा केल्या. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. याशिवाय 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 41 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर वृद्धिमान साहाने लिस्ट ए मध्ये 138 सामन्यांमध्ये 7013 धावा आणि 116 सामन्यांमध्ये 3072 धावा केल्या. त्याने 2011 आणि 2022 मध्ये आयपीएल जिंकले आहे. आयपीएल फायनलमध्ये शतक झळकावणारा रिद्धिमान साहा हा पहिला फलंदाज ठरला आहे. रिद्धिमान साहाने 170 IPL सामन्यात 2934 धावा केल्या आहेत.


संबधित बातमी:


India vs New Zealand, 3rd Test : जे घडू नये ते घडलं, तब्बल 24 वर्षांनी मुंबईच्या घरच्या मैदानावर शिकाऱ्यांचीच 'शिकार' झाली, कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला?