BCCI Central Contract : बीसीसीआयने 40 भारतीय क्रिकेटपटूंना वार्षिक करार दिला आहे. क्रिकेटपटूंना 2023-24 हंगामासाठी हा करार मिळाला आहे. खेळाडूंची ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली. या 40 नावांव्यतिरिक्त 5 खेळाडूंना वेगळे करार मिळाले आहेत. बीसीसीआयने निवेदनात म्हटले आहे की, निवड समितीने वेगवान गोलंदाजीच्या कराराची शिफारस केली होती आणि त्यामुळे त्यात 5 नावांचा समावेश करण्यात आला आहे.  इंग्लंडविरुद्ध दणक्यात पदार्पण करणाऱ्या आकाश दीपचा सुद्धा या करारात समावेश करण्यात आला आहे.







आकाश दीप 


वेगवान गोलंदाज आकाश दीपने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीत पदार्पण केले. त्याने पहिल्याच स्पेलमध्ये नवीन चेंडूवर तीन बळी घेतले. आकाशला वेगवान गोलंदाजीचा करार मिळाला आहे. बिहारचा आकाश बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.



विदावथा कावरप्पा 


विदावथा कावरप्पा कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. त्याच्या नावावर 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 80 विकेट आहेत. यासह त्याने 18 लिस्ट ए सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत. रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने 10 विकेट घेतल्या. मोसमातील अवघ्या 5 सामन्यांत त्याने 25 बळी घेतले आहेत. त्याला इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळण्याची संधीही मिळाली.



यश दयाल 


यूपीचा वेगवान गोलंदाज यश दयाल यालाही वेगवान गोलंदाजीचा करार मिळाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज दयालने आतापर्यंत 23 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्याच्या नावावर 72 बळी आहेत. त्याला भारतीय संघात स्थान मिळाले पण खेळण्याची संधी मिळाली नाही.



उमरान मलिक 


उमरान मलिक हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान गोलंदाज मानला जातो. त्याने ताशी 155 किमी पेक्षा जास्त वेगाने चेंडू टाकला आहे. मात्र, उमरान सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. उमरानच्या नावावर 18 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 24 विकेट आहेत.



विजयकुमार वैशाख 


कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाखचाही बीसीसीआयने वेगवान गोलंदाजीच्या करारात समावेश केला आहे. त्याने आतापर्यंत 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 86 विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.


इतर महत्वाच्या बातम्या