Kieron Pollard 5 Sixes To Rashid Khan: द हंड्रेड लीगमध्ये सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्सचे संघ आमनेसामने होते. या सामन्यात सदर्न ब्रेव्हने ट्रेंट रॉकेट्सचा 2 गडी राखून पराभव केला. कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) आक्रमक फलंदाजीमुळे सदर्न ब्रेव्हचा विजयाचा मार्ग सोपा झाला. 


कायरन पोलार्डने  23 चेंडूत 45 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकार लगावले. विशेष म्हणजे हे पाच षटकार कायरन पोलार्डने राशिद खानविरुद्ध सलग 5 चेंडूत लगावले. कायरन पोलार्डने डावाच्या 81व्या, 82व्या, 83व्या, 84व्या आणि 85व्या चेंडूवर सलग षटकार ठोकले. 


सदर्न ब्रेव्हसमोर केवळ 127 धावांचे लक्ष्य असले तरी ट्रेंट रॉकेट्सच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे सदर्न ब्रेव्हला 127 धावा करण्यासाठी 99 चेंडू खेळावे लागले. फलंदाजीला येण्यापूर्वी ट्रेंट रॉकेट्सने 100 चेंडूत 8 गडी बाद 126 धावा केल्या. ट्रेंट रॉकेट्ससाठी यष्टिरक्षक फलंदाज टॉम बेंटनने 17 चेंडूत सर्वाधिक 30 धावा केल्या. याशिवाय ॲडम लिथ, जो रूट, रोव्हमन पॉवेल आणि लुईस ग्रेगरी या फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले.


कायरन पोलार्डने राशिद खानला धुतलं-


ट्रेंट रॉकेट्सच्या 126 धावांना प्रत्युत्तर देताना सदर्न ब्रेव्हने प्रथम 1 चेंडू राखून लक्ष्य गाठले. सदर्न ब्रेव्हकडून कायरन पोलार्डने 23 चेंडूत 45 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. यावेळी राशिद खानला त्याने धू धू धुतलं. कायरन पोलार्डचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 


6,6,6,6,6...संपूर्ण व्हिडीओ-






संबंधित बातमी:


अमन सेहरावतने 10 तासात 4.6 किलो वजन घटवलं, जे विनेश फोगाटसोबत घडलं, ते अमनने टाळलं, रात्रभर जीममध्ये घाम गाळला!