West Indies vs Bangladesh : बांग्लादेशचा संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळवले जाणार आहेत. यातील दोन्ही कसोटी सामने वेस्टइंडीज संघाने जिंकले आहेत. याच दरम्यान वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज केमार रोच (Kemar Roach) याने  दुसऱ्या कसोटीत एक खास रेकॉर्ड नावे केला आहे. त्याने बांग्लादेशच्या दुसऱ्या डावात तामिम इकबालला बाद करताच दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. तो वेस्ट इंडिज संघासाठी 250 विकेट्स घेणारा सहावा तर वेगवान चौथा गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे मागील 27 वर्षात 250 हून अधिक विकेट्स घेणारा तो पहिलाच वेस्ट इंडिजचा गोलंदाज बनला आहे. 



73 व्या सामन्यात केला रेकॉर्ड


केमार रोच याने सामन्यातील दुसऱ्या डावात तामिम इकबालची विकेट घेतली आणि एक खास रेकॉर्ड नावावर केला. त्याने ही एक विकेट घेताच मायकल होल्डिंग, कर्टली एम्ब्रोस अशा दिग्गज गोलंदाजाच्या पंगतीत स्थान मिळवलं. रोचच्या आधी कर्टनी वॉल्शने, कर्टली एम्ब्रोसने आणि माल्कम मार्शल यांनी हा रेकॉर्ड केला आहे. यांच्यानंतर आता वेस्ट इंडिजकडून 250 विकेट्स पूर्ण करणारा केमार वेगवान गोलंदाज ठरला आहे.  केमारला ही कामगिरी करण्यासाठी 73 कसोटी सामने खेळावे लागले.


वेस्टइंडीजकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज


कर्टनी वॉल्श- 519 विकेट्स
कर्टली एम्ब्रोस- 405 विकेट्स
मैल्कम मार्शल- 376 विकेट्स
लांस गिब्स- 309 विकेट्स
जोएल गार्नर- 259 विकेट्स
केमार रोच- 252 विकेट्स


रोचची कसोटी कारकिर्द


रोच (Kemar Roach) याने त्याच्या कारकिर्दीत 73 टेस्ट मॅच खेळल्या असून यामध्ये 132 डावात 26.75 च्या सरासरीने आणि 3.04 च्या इकॉनमीने 252 विकेट्स घेतले आहेत. 48 धावा देत 6 विकेट्स घेणं हे त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन ठरलं आहे. तर एका सामन्यात 146 धावा देत 10 विकेट्स घेणं त्याचा सर्वोत्तम प्रदर्शन आहे. 


हे देखील वाचा -