नवी दिल्ली : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक (Team India Coach) राहुल द्रविड याच्या जागी नव्या प्रशिक्षकाचा शोध बीसीसीआयनं (BCCI) सुरु केला आहे. राहुल द्रविडचा कालावधी जून 2024 मध्ये संपणार आहे. राहुल द्रविडला मुदत वाढवून देण्यासंदर्भात बीसीसीआयनं विचार केला होता. मात्र, द्रविडनं त्याला सहमती दिली नाही. अखेर टीम इंडियासाठी नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु करण्यात आला आहे. भारताचा नवा कोच असणार या चर्चा सुरु असताना लखनौ सुपर जाएंटसचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरचं (Justin Langer) मोठं वक्तव्यसमोर आलं आहे.
भारताच्या टीमला कोचिंग करणं छान काम आहे, असं जस्टीन लँगरनं म्हटलं. मात्र, हे सांगतानाच त्यानं तो भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीपासून दूर असल्याचं म्हटलं. लँगरनं आयपीएल 2024 मध्ये लखनौचा कॅप्टन केएल राहुलसोबत झालेल्या चर्चेचा दाखला देत भाष्य केलं आहे. लखनौचा कॅप्टन केएल राहुलनं मला भारताच्या प्रशिक्षकपदाच्या कामातील अडचणी सांगितल्या. त्यामध्ये दबाव आणि राजकारणाचा देखील समावेश असल्याचं लँगरन म्हटलं.
बीसीसीआयनं मुख प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ जून 2024 ला संपणार आहे. आगामी साडे तीन वर्षांसाठी बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतासह विदेशातील व्यक्ती देखील प्रशिक्षक होऊ शकते असं म्हटलंय.
भारताच्या प्रशिक्षकपदासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कोच स्टीफन फ्लेमिंग, दिल्ली कॅपिटल्सचा हेड कोच रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर आणि टॉम मुडी यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, लँगर आणि पॉटिंग यांनी जाहीरपणे ते भारताचं प्रशिक्षकपद स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे.
जस्टीन लँगरनं भारताचं प्रशिक्षक होणं हे छान काम आहे पण सध्या नाही, असं बीबीसीच्या स्टम्प्ड पॉडकास्टमध्ये म्हटलं.मला प्रशिक्षकपदाच्या कामाची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी चार वर्ष काम केलं आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर हे थकवणारं काम आहे, असं लँगर म्हणाला.
जस्टीन लाँगरनं केएल राहुलशी झालेल्या चर्चेचा दिला. केएल राहुल म्हणाला होता, तुम्हाला माहिती आहे की "आयपीएलच्या टीममध्ये राजकारण आणि दबाव असतो. त्याच्या एक हजार पट दबाव आणि राजकारण भारताचा प्रशिक्षक म्हणून काम करताना असतो".केएल राहुलचा तो सल्ला योग्य होता, असं लँगरनं म्हटलं.
संबंधित बातम्या :
USA vs BAN : बांगलादेशचे वाघ ढेपाळले, दुसऱ्या टी-20 मॅचसह मालिका गमावली,अमेरिकेचा ऐतिहासिक विजय