Ambati Rayudu On RCB अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं (Royal Challengers Bengaluru) पहिल्या आयपीएल विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) आरसीबीला 4 विकेटनं पराभूत केलं. एलिमिनेटरमध्ये पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायुडूनं (Ambati Rayudu) मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे. अंबाती रायडूनं आरसीबीच्या पराभवावर बोलताना कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र, अंबाती रायुडूचा रोख विराट कोहलीच्या दिशेनं होता.    


अंबाती रायुडूनं कोणत्याही खेळाडूचं नाव घेतलं नाही मात्र, आक्रमकता आणि सेलिब्रेशननं ट्रॉफी जिंकता येत नाही, असं म्हटलं.आरसीबीनं चेन्नई सुपर किंग्जला लीग स्टेजमध्ये पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केलाहोता. आरसीबीनं सलग सहावा विजय मिळवला होता. आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चेन्नईला 18 पेक्षा जास्त धावांनी पराभूत करण्याची गरज होती. आरसीबीनं चेन्नईवर 27 धावांनी विजय मिळवला होता. आरसीबीच्या विजयासह चेन्नईचं आव्हान संपुष्टात आलं होतं.


चेन्नईला पराभूत केल्यानंतर विराट कोहली आणि बंगळुरुच्या खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं होतं. विराट कोहलीनं सर्वात जास्त सेलिब्रेशन केलं होतं. विराट कोहलीनं त्यावेळी आक्रमकपणे विजयाचा जल्लोष करत होता.  


आरसीबीचा एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सनं पराभव केल्यानंतर अंबाती रायुडूनं म्हटलं की," आयपीएल ट्रॉफी सेलिब्रेशन आणि आक्रमकतेनं मिळत नाही. फक्त चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करुन आयपीएल ट्रॉफी मिळत नाही. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी प्लेऑफमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज असते, असं अंबाती रायुडू म्हणाला.   


अंबाती रायुडू चेन्नईच्या पराभवावेळी रडला


चेन्नई आणि बंगळुरुची मॅच ज्या दिवशी पार पडला त्यावेळी अंबाती रायुडू स्टार स्पोर्टसच्या शोमध्ये होता. चेन्नई सुपर किंग्ज पराभूत झाल्यानं अंबाती रायुडू रडला होता. ऑनकॅमेरा अंबाती रायुडू रडला तो त्याच्या भावनांना आवर घालू शकला नव्हता. आरसीबीची पराभव झाल्यानंतर अंबाती रायुडूनं हिशोब चुकता केला आहे. रायुडूनं कुणाचं नाव घेतलं नसलं तरी त्याचा रोख विराट कोहलीच्या दिशेनं आहे हे स्पष्ट होतं. 


एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा पराभव


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या मॅचमध्ये आरसीबीनं पहिल्यांदा फलंदाजी करातना 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 172 धावा केल्या, तर, राजस्थान रॉयल्सनं 19 व्या ओव्हरमध्येच बंगळुरुला पराभूत केलं. राजस्थाननं चार विकेटनं बंगळुरुला पराभूत केलं. 


संबंधित बातम्या : 


Video : विराट म्हणाला स्वाभिमानासाठी लढलो, फाफनं काय चुकलं ते मांडलं, डीकेच्या भेटीगाठी, ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?


RCB कडून गार्ड ऑफ ऑनर, विराटची मिठी; डीके दादाच्या निवृत्तीनंतर अख्खं मैदान भावूक, पाहा व्हिडीओ!