Australia vs Pakistan ODI-T20 series : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 4 नोव्हेंबर रोजी खेळला गेला, ज्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर 2 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार पॅट कमिन्सने बॉल आणि बॅट या दोन्हीत चमत्कारिक कामगिरी करत आपल्या संघाला रोमहर्षक पद्धतीने विजय मिळवून दिला. पॅट कमिन्सने 9.4 षटकात 39 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांची शिकार केली. कमिन्स आणि मिचेल स्टार्कच्या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही आणि 46.4 षटकांत 203 धावांवर आटोपला. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत दिसला, तेव्हा कर्णधार पॅट कमिन्सने जबाबदारी स्वीकारली आणि 8 विकेट्स पडूनही आपल्या संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले. या सामन्यात कमिन्सने 31 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 32 धावांची मौल्यवान खेळी केली.


पहिला सामना जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा सामना दुसरा एकदिवसीय सामना 8 नोव्हेंबरला ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाने एका रात्रीत आपला कर्णधार बदलला आहे. पॅट कमिन्सऐवजी 29 वर्षीय जोश इंग्लिसकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे. दुसऱ्या वनडेत पॅट कमिन्स कर्णधार असला तरी तिसऱ्या सामन्यात जोश इंग्लिश संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. कमिन्स तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाचा भाग असणार नाही. एकदिवसीय मालिकेनंतर जोश इंग्लिस पाकिस्तानविरुद्धच्या टी-20I मालिकेतही संघाचे नेतृत्व करेल. पॅट कमिन्सही या मालिकेत खेळणार नाही.




खरंतर, पॅट कमिन्सशिवाय स्टीव्ह स्मिथ, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि मार्नस लॅबुशेन हे देखील पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळणार नाहीत. या सर्व खेळाडूंना बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट आणि स्पेन्सर जॉन्सन यांचा यष्टीरक्षक-फलंदाज जोश फिलिपसह ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.


पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा वनडे संघ : पॅट कमिन्स (कर्णधार - पहिले दोन सामने), जोश इंग्लिस, (कर्णधार - तिसरा सामना), शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट (केवळ तिसरा सामना), कूपर कोनोली, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी , जोश हेझलवूड (केवळ दुसरा सामना), स्पेन्सर जॉन्सन (फक्त तिसरा सामना), मार्नस लॅबुशेन (पहिले दोन सामने), ग्लेन मॅक्सवेल, लान्स मॉरिस, जोश फिलिप (केवळ तिसरा सामना), मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (पहिले दोन सामने), मिशेल स्टार्क (पहिले दोन सामने), मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.


पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : जोश इंग्लिस (कर्णधार/विकेटकीपर), शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा.


हे ही वाचा -


IPL 2025 Mega Auction : पंत-अय्यरसह 23 भारतीय खेळाडू 2 कोटींच्या ड्राफ्टमध्ये! सर्फराजने मूळ किंमत केली कमी, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट