IPL 2025 Mega Auction Indian Players Base Price : दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अखेर आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीबाबत माहिती शेअर करण्यासोबतच ठिकाणही जाहीर केले. बीसीसीआयने रियाधऐवजी सौदी अरेबियातील जेद्दाहची निवड केली आहे. येथे 24 आणि 25 नोव्हेंबर असे दोन दिवस मेगा लिलाव होणार आहे. जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-20 लीग आयरपीएल 2025 च्या हंगामासाठी 16 देशांतील 1500 हून अधिक खेळाडूंनी मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवार, 5 नोव्हेंबर रोजी आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी नोंदणी करणाऱ्या खेळाडूंची माहिती दिली आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या प्रकाशनानुसार IPL 2025 च्या मेगा लिलावासाठी 16 देशांतील एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली आहे, त्यापैकी 1165 भारतीय आहेत. तर 409 आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. 


खेळाडूंची यादी समोर आल्यानंतर आधारभूत किमतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर या बहुतेक खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. सर्फराज खान, पृथ्वी शॉ यांसारख्या खेळाडूंनी त्यांची आधारभूत किंमत काय निश्चित केली आहे ते जाणून घेऊया.


24-25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात जवळपास 200 खेळाडूंवर बोली लावली जाऊ शकते. या कारणास्तव याला आयपीएल मेगा ऑक्शन असेही म्हटले जात आहे. या लिलावासाठी ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी यांची किंमत 2 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीच्या यादीत खलील अहमद, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, इशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसीद कृष्णा, टी. नटराजन, देवदत्त पडिक्कल, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादवही यांचा समावेश आहे.


बंगळुरू कसोटीत 150 धावांची खेळी खेळणाऱ्या सर्फराज खानने त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये निश्चित केली आहे. सर्फराज गेल्या लिलावात अनसोल्ड राहिला होता. पृथ्वी शॉनेही त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवली आहे. खराब फॉर्ममुळे पृथ्वी रणजी संघाबाहेर आहे. गेल्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कने त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये ठेवली आहे. आयपीएल 2024 साठी कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले.


आयपीएल लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी 320 कॅप्ड आणि 1224 अनकॅप्ड आहेत. सर्वाधिक 48 कॅप्ड खेळाडू भारताचे आहेत. आयपीएल 2025 साठी 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले आहे. उर्वरित खेळाडूंचा लिलावाद्वारे संघात समावेश करण्यात येणार आहे. एका संघात जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. 


'या' भारतीय खेळाडूंची मूळ किंमत आहे 2 कोटी रुपये  


ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अश्विन, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, खलील अहमद, दीपक चहर, व्यंकटेश अय्यर, आवेश खान, इशान किशन, मुकेश कुमार, भुवनेश्वर कुमार, प्रसिद्ध कृष्णा, टी नटराजन, देवदत्त पडिक्कल, कृणाल पांड्या, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.


लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पर्स आहे शिल्लक?


चेन्नई सुपर किंग्ज - 55 कोटी रुपये
मुंबई इंडियन्स – 45 कोटी रुपये
कोलकाता नाईट रायडर्स – 51 कोटी रुपये
राजस्थान रॉयल्स- 41 कोटी रुपये
सनरायझर्स हैदराबाद – 45 कोटी रुपये
गुजरात टायटन्स – 69 कोटी रुपये
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – 83 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स – 73 कोटी रुपये
पंजाब किंग्स – 110.5 कोटी रुपये
लखनऊ सुपर जायंट्स – 69 कोटी रुपये