Jos Buttler In IPL 2025 Auction : यावेळी आयपीएल 2025 मेगा लिलावात अनेक मोठे खेळाडू सहभागी होत आहेत, ज्यामुळे ते आणखी रोमांचक होणार आहे. कोणत्या खेळाडूंना संघात यांची तयारी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, काही संघांनी सोडलेले खेळाडू सध्या जबरदस्त कामगिरी दाखवत आहेत. असाच एक खेळाडू जोस बटलर त्याला राजस्थान रॉयल्स संघाने सोडले. जोस बटलरने 2024च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दोन शतके झळकावली होती. उर्वरित सामन्यांमध्ये त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.
त्यामुळे, पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठीही जोस बटलरला राजस्थान रॉयल्स संघात कायम ठेवण्यात येईल, असे मानले जात होते, परंतु तसे झाले नाही. रिटेन्शन लिस्ट आऊट झाल्यावर त्यात जॉस बटलरचे नाव नसल्याचे समोर आले. दरम्यान, जोस बटलर दुखापतीमुळे जवळपास चार महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. अशा स्थितीत तो मैदानात परतल्यावर तो पूर्वीप्रमाणेच फलंदाजी करेल की नाही हे सांगणे कठीण होते.
जोस बटलरने पुनरागमन केल्यानंतर आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये तो पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार आणि तुफानी फलंदाजी करत सर्वांची बोलती बंद केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना जॉसने 45 चेंडूत 83 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 8 चौकार आणि 6 षटकार मारले.
राजस्थान रॉयल्ससाठी अजून डोकेदुखी म्हणजे पुढील लिलावातही राईट टू मॅच कार्ड अंतर्गत जोस बटलरला परत आणू शकत नाहीत. कारण संघाने आपल्या सर्व 6 खेळाडूंना कायम ठेवले आहे. अशा परिस्थितीत जॉस राजस्थानकडून खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. जोस बटलर सलामीसोबतच तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो आणि गरजेनुसार गीअर बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे.
हे ही वाचा -