Border Gavaskar Trophy 2024-25 : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीच्या एका निर्णयाने सर्वांनाच चकित केले आहे. टीम इंडियाच्या आधी विराट कोहली ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाला पोहोचणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, विराट कोहली रविवारी संध्याकाळीच ऑस्ट्रेलियाला पोहोचला. न्यूझीलंडविरुद्धचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी लागला आहे, त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी तो आधीच गेला. पहिला कसोटी सामना पर्थमध्येच खेळवला जाईल. 


टीम इंडिया दोन बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना झाली असून त्यांच्या आधी विराट गेला होता. विराट कोहली शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसला होता. तो पत्नी अनुष्का आणि दोन मुलांसोबत होता. अर्थात विराट कोहली शनिवारीच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता.




खरंतर, कोहली टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला का नाही गेला याचे अनेक कारणे आहे, पण गेल्या काही काळापासून तो खराब फॉर्ममध्ये आहे. गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये विराटला फक्त एकच अर्धशतक करता आले आणि शेवटच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून त्यांच्याच घरच्या मैदानावर 0-3 असा पराभव पत्करावा लागला. आता विराट कोहलीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने तर विराटसारखी कामगिरी केली असती तर तो संघात कधीच राहिला नसता, असे म्हटले आहे. आता विराट ऑस्ट्रेलियाला पोहोचला असून आता टीकाकारांच्या मुसक्या आवळणे आणि टीम इंडियाला विजय मिळवून देणे हेच त्याचे ध्येय असेल.


दरम्यान, आज पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत गंभीरला वरिष्ठ खेळाडूंच्या खराब फॉर्मबद्दल विचारले असता मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, पाँटिंगचा भारतीय क्रिकेटशी काहीही संबंध नाही. मला वाटते त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा विचार करायला हवा. कोहली आणि रोहितमध्ये संघासाठी चांगली कामगिरी करण्याची भूक आहे. त्यामुळे त्यांची चिंता नाही.


ऑस्ट्रेलियात विराट कोहलीची कामगिरी


ऑस्ट्रेलियात विराट कोहलीने 8 शतके झळकावली आहेत. त्याची फलंदाजीची सरासरी 47.48 आहे. विराटने 25 सामन्यात 2042 धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या चाहत्यांना आशा असेल की तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियात धावा करेल आणि टीम इंडियाला तिथे विजय मिळवून देईल.


हे ही वाचा -


Gautam Gambhir Press Conference : पाँटिंगच्या प्रश्नावर पलटवार ते नितीश रेड्डीला संघात का घेतलं? गौतम गंभीरच्या पत्रकार परिषदेतील 6 मोठ्या गोष्टी