मुंबई : टीम इंडियाचे (Team India) महान खेळाडू अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) कर्करोगाशी  झुंज देत आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यावरील उपचारासाठी मदत मिळावी, यासाठी माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी बीसीसीआयसोबत (BCCI) पत्र व्यवहार केला होता. कपिल देव यांच्या पत्राची दखल घेत बीसीसीआयनं मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत म्हणून तातडीनं 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. 


जय शाह यांनी अंशुमन गायकवाड यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली आहे. याशिवाय जय शाह  यांनी यावेळी त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि मदत करण्याचे आदेश बीसीसीआयला दिल्याचं म्हणाले.






अंशुमन गायकवाड यांच्यासाठी कपिल देव यांचे प्रयत्न


अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. भारताचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी दोन वेळा कामगिरी बजावली आहे.अंशुमन गायकवाड यांच्यावर वर्षभरापासून लंडनच्या किंग्ज कॉलेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  अंशुमन गायकवाड यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी विनंती कपिल देव यांनी बीसीसीआयकडे केली होती. कपिल देव यांनी त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम द्यायला तयार आहेत, असंही म्हटलं. अंशुमन गायकवाड यांचं सध्याचं वय 71 वर्ष आहे. त्यांच्या सोबत भारताकडून क्रिकेट खेळणाऱ्या सहकाऱ्यांनी निधी उभारणीची मोहीम देखील सुरु केली होती. 


भारताचे प्रशिक्षक म्हणूनही काम


भारतीय क्रिकेट संघासाठी अंशुमन गायकवाड यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलेलं आहे. अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी एकूण 40 कसोटी  खेळल्या. 15 एकदिवसीय सामन्यांमध्येही त्यांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं. याशिवाय दोन वेळा त्यांनी भारताचे प्रशिक्षक म्हणून देखील काम केलं.  अंशुमन गायकवाड यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून कपिल देव आणि सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून बीसीसीआयनं त्यांना एक कोटींची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. 


संबंधित बातम्या :



यशस्वी-गिलचा झंझावात, झिम्बाब्वेचा दाणादाण, भारताचा 10 विकेटने विजय, मालिकाही खिशात