Kapil Dev Test Record : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू म्हणजे कपिल देव (Kapil Dev). दमदार फलंदाजी करणारे देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचाही डोंगर रचला होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 434 कसोटी विकेट्स घेतल्याने मागील बरीच वर्षे ते टॉप 10 मध्ये होते. पण आता ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियोन (Nathan Lyon) श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दोन्ही डावात मिळून तब्बल 9 विकेट्स घेत देव यांना मागे टाकलं आहे. नाथनच्या नावे 436 विकेट्स झाल्यामुळे तो कपिल देव यांच्या पुढे पोहोचला असून कपिल देव आता 11 व्या स्थानावर असून नाथन दहाव्या स्थानी पोहोचला आहे.
 
सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत भारताचे माजी कर्णधार कपिल देव 434 विकट्सच्या मदतीने 10 व्या स्थानावर होते. पण ऑस्ट्रेलियाच्या नाथनने 436 विकेट्स पूर्ण करत दहावं स्थान मिळवत कपिल देव यांना टॉप10 मधून बाहेर केलं आहे. नाथनने 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 109 कसोटी सामने खेळत या विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने 31.77 च्या बोलिंग अॅव्हरेजने 436 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यावेळी नाथनने 20 वेळा 5 हून अधिक तर 3 वेळ 10 विकेट्स मिळवल्या आहेत.


स्टेन आणि आश्विनला पछाडण्याची संधी
 
पुढील कसोटी सामन्यांत नाथन आठव्या स्थानावर पोहचून भारताच्या आश्विन आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनसा मागे टाकू शकतो. सध्या डेल स्टेनच्या नावावर 439 विकेट्स असून तो नवव्या स्थानावर आहे. तर आश्विन 442 विकेट्ससह आठव्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेतल्यानंतर नाथन दोघांनाही मागे टाकू शकतो.


टॉपवर मुथय्या मुरलीधरन


टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा दिग्गज माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. त्याच्या नावावर 800 विकेट्स असून दुसऱ्या स्थानावर शेन वॉर्न 708 विकेट्ससह विराजमान आहे.तर तिसऱ्या स्थानावर इंग्लडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन 653 विकेट्ससह विराजमान आहे.


हे देखील वाचा-