Commonwealth Games 2022 Day 4 India Schedule: भारतीय बॉक्सर अमित पंघल आज 2022 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील त्याचा पहिला सामना खेळणार आहे. पुरुष बॅडमिंटन आणि टेबल टेनिस संघ सोमवारी बर्मिंगहॅम येथे उपांत्य फेरीत खेळतील. गोल्ड कोस्ट 2018 रौप्यपदक विजेता अमित पंघल त्याच्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा 2022 च्या मोहिमेची सुरुवात पुरुषांच्या फ्लायवेट फेरी 16 मध्ये वानुआतुच्या नामरी बेरीविरुद्ध करेल.


बॅडमिंटन मिश्र संघाला उपांत्य फेरीत जगज्जेता लोह कीन य्यूच्या नेतृत्वाखालील सिंगापूरचे कडवे आव्हान असेल. गतविजेता पुरुष टेबल टेनिस संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल. त्यांचा सामना नायजेरियाशी होईल. तर, काल घानाविरुद्ध मोठा विजय मिळवणारा भारतीय पुरूष हॉकी संघ आपला दुसरा पूल सामना खेळणार आहे. तसेच भारतीय जिम्नॅस्टिक्स प्रणती नायक बर्मिंगहॅम 2022 मध्ये महिला व्हॉल्ट फायनलमध्ये भाग घेणार आहे.


भारताचं कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मधील आजचं वेळापत्रक-


जिम्नॅस्टिक
महिला व्हॉल्ट फानयनल: प्रणती नायक - संध्याकाळी 6:40 वा.


बॅडमिंटन
मिश्र संघ उपांत्य फेरी: भारत विरुद्ध सिंगापूर - रात्री 10:00 वा.


बॉक्सिंग
पुरुष फ्लायवेट राऊंड 16: अमित पंघल विरुद्ध नामरी बेरी- दुपारी 4:45 वा.
पुरुष फेदरवेट राऊंड 16:  मोहम्मद हुसामुद्दीन विरुद्ध मोहम्मद सलीम हुसेन (बांग्लादेश)- संध्याकाळी 6.00 वा.
पुरूष लाईट वेट राऊंड 16: आशिष कुमार विरुद्ध ट्रॅव्हिस टॅपुएटोआ- दुपारी 1:00 वा.


हॉकी
पुरुष पूल बी: भारत विरुद्ध इंग्लंड - रात्री 8:30 वा.


लॉन बाऊल्स
महिला दल उपांत्य फेरी: भारत विरुद्ध न्यूझीलंड - दुपारी 1:00 वा


स्क्वॅश
महिला एकेरी प्लेट उपांत्यपूर्व फेरी: सुनैना कुरुविला विरुद्ध टीडीबी- दुपारी 4:30 वा.
महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी: हॉली नॉटन (कॅनडा) विरुद्ध जोश्ना चिनप्पा - संध्याकाळी 6:00 वा.
पुरुष एकेरी उपांत्यपूर्व फेरी: ग्रेग लोबन (स्कॉटलँड) विरुद्ध सौरव घोषाल - संध्याकाळी 6:45 वा.


जलतरण
पुरुष 100 मीटर बटरफ्लाय हीट 6 : साजन प्रकाश - दुपारी 3:51 वा.


टेबल टेनिस
पुरुष संघ उपांत्य फेरी: भारत विरुद्ध नायजेरिया - रात्री 9:30 वा.


वेटलिफ्टिंग
पुरुष 81 किलो अंतिम फेरी: अजय सिंग - दुपारी 2:00 वा.
महिला 71 किलो अंतिम फेरी: हरजिंदर कौर - 11:00 वा.


हे देखील वाचा-