एक्स्प्लोर

Jasprit Bumrah : बुमराह दुसऱ्या कसोटीत खेळणार नाही, संकटातील टीम इंडियासमोर दोन पर्याय, गिल कुणाला संधी मिळणार?

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला दुसऱ्या कसोटीत विश्रांती दिल्यास शुभमन गिल कुणाला संधी मिळणार याकडे सर्वाचंं लक्ष लागलं आहे.

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल. पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांना 371 धावांचा बचाव करण्यात अपयश आलं होतं. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या माऱ्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते. आता टीम इंडियाच्या नियोजनानुसार दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाणार हे निश्चित आहे. यामुळं पहिल्यापासून टीम इंडियाचा गोलंदाजीचा मारा कमजोर दिसत असताना जसप्रीत बुमराहची जागा कोण भरुन काढणार हा प्रश्न आहे.  
  
टीम इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी जसप्रीत बुमराह या कसोटीत तीन कसोटी खेळणार असल्याचं म्हटलं. याशिवाय जसप्रीत बुमराहनं देखील इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर तो या दौऱ्यात केवळ  3 कसोटी खेळणार असल्याचं म्हटलं होतं. बुमराहवर गोलंदाजी करताना येणारा ताण लक्षात घेऊन 3 कसोटीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावेळी भारतीय निवड समिती, कोच आणि कॅप्टन यांना भारतानं पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यास बुमराहाला विश्रांती देणं सोपं ठरेल असं वाटलं होतं.  

एजबेस्टन कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. या कसोटीत बुमराहला विश्रांती दिली जाईल. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया 0-1 नं पिछाडीवर आहे. आता जसप्रीत बुमराह शिवाय टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. टीम इंडियासमोर सध्या दोन पर्याय आहेत. यामध्ये आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या दोघांचा पर्याय आहे. दोन्ही खेळाडूंनी स्वत:ला सिद्ध केलेलं आहे. बुमराहला विश्रांती दिल्यास एजबेस्टन कसोटीचं तिकीट कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरनं पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. यशस्वी जयस्वास, शुभमन जयस्वाल, रिषभ पंत, केएल राहुल यांनी शतकी खेळी केली होती. टीम इंडियाच्या मधल्या फळीला आणि लोअर मिडल ऑर्डरला चांगली फलंदाजी करण्यात अपयश आलं होतं. लीडस कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये टीम इंडियाची मधली फळी आणि लोअर मिडल ऑर्डर अपयशी ठरली होती, त्यात सुधारणं करणं आवश्यक आहे.

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर

बेन स्टोक्स (कॅप्टन ), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जॅकब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओवर्टन, ओली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, जोश टंग  आणि क्रिस वोक्स. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Team India : गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळ, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Embed widget