Jasprit Bumrah : सद्यस्थितीला भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज म्हटलं तर जसप्रीत बुमराह  (Jasprit Bumrah) तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणारा बुमराह सध्या कमाल फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तब्बल 6 विकेट्स घेतल्यामुळे बुमराह  एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. पण अशामध्ये आगामी टी20 विश्वचषकापूर्वी बुमराहचा वर्क लोड योग्य ठेवण्याची गरज असल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज  ब्रॅड हॉग याने (Brad Hogg) म्हटलं आहे. 


भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून एकदिवसीय मालिका सध्या खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने कमाल विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो जसप्रीत बुमराह. त्याने एकदिवसीय सामन्यात केवळ 19 धावा देत तब्बल 6 इंग्लंडचे फलंदाज तंबूत धाडले. त्याआधी  एजबेस्टन टेस्टसह टी20 मालिकेतही बुमराहने कमाल कामगिरी केली होती. या सर्वामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup) भारतीय संघासाठी तो महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. याबाबतच बोलताना ब्रॅड हॉग याने महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. 


'वर्कलोड योग्यपणे मॅनेज करणं महत्त्वाचं'


ऑस्ट्रेलिया संघाचा माजी फिरकीपटू  ब्रॅड हॉग (Brad Hogg) याने बुमराहबद्दल प्रतिक्रिया देताना तो उत्तम खेळाडू आहे. पण संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरील वर्क लोडचं योग्य नियोजन केलं नाही तर त्याच्या खेळावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असं त्याने म्हटलं आहे. तो म्हणाला,''बुमराहचा वर्कलोड योग्यरितीने मॅनेज करायला हवा, त्यामुळे तो सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यांसाठी रिफ्रेश राहील. तसंच वेगवान गोलंदाजाला टी20 सामन्यात चांगली कामगिरी करायची असल्यास मेडिकल स्टाफला योग्य ती आणि अधिकची काळजी खेळाडूची घ्यावी लागते.ब्रेट ली याचं उदाहरण देताना हॉगने 2003 विश्वचषकात ली याला फिजीओची फार मदत झाल्याचं हॉग म्हणाला.


हे देखील वाचा-