ICC Rankings : भारतीय फलंदाजांप्रमाणेच भारतीय गोलंदाजांचाही आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये (ICC Rankings) बोलबाला आहे. आयसीसीच्या यादीत इंग्लंडला जेरीस आणणारे 3 खेळाडू टॉप 6 मध्ये आहेत. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) चौथा कसोटी सामन्यात विश्रांती घेतली असताना देखील तो पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत 500 विकेट्स पूर्ण करणारा रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा एकही गोलंदाज सध्याच्या टेस्ट रॅकिंगमध्ये टॉप 10 मध्ये देखील नाही. शाहीन आफ्रिदी सध्या 12 व्या क्रमांकावरुन असून तो पाकिस्तानकडून बेस्ट बॉलर आहे.


आयसीसीने बुधवारी (दि.28) कसोटी क्रमवारी जाहिर केली. नव्या आयसीसी रॅकिंगमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) 846 गुणांसह पहिल्या क्रमांकाववर आहे. तर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन 846 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कगिसो रबाडाने 828 गुण मिळवले असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिंस आणि जॉश हेजलवूड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. 


क्रमवारीत टॉप 10 मध्ये जेम्स अँडरसन एकमेव इंग्लंड गोलंदाज


इंग्लंडची धुळदाण करणारा रवींद्र जाडेजा 785 गुणांसह गोलंदाजांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. जाडेजानंतर प्रबथ जयसुर्या, नेथन लायन, कायले जॅम्सन अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहे. जेम्स अँडरसन एकमेव इंग्लंड गोलंदाज आहे, जो टॉप 10 मध्ये आहे. 


अष्टपैलूंमध्ये जाडेजा पहिल्या क्रमांकावर 


अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जाडेजा हा पहिल्या क्रमांकावर आहे. जाडेजा समवेत रविचंद्रन अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे. बांगलादेशचा शकिब-अल-हसन तिसऱ्या आणि इंग्लंडचा जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. 


आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडू कोणत्या क्रमांकावर 


विराट कोहली - 9 यशस्वी जायस्वाल - 12 रोहित शर्मा - 13 ऋषभ पंत - 14 शुभमन गिल - 31 रवींद्र जाडेजा - 37 चेतेश्वर पुजारा - 38 अजिंक्य रहाणे - 49 श्रेयस अय्यर - 52 अक्षर पटेल - 53
केएल राहुल - 55 ध्रुव जुरेल - 69 आर. अश्विन - 82


इतर महत्वाच्या बातम्या 


BCCI Central Contract :BCCI चा इशान किशन -श्रेयस अय्यरवर सर्जिकल स्ट्राईक; वार्षिक यादी जाहीर, रोहित विराटला किती कोटी मिळणार?