IND vs ENG Dharamsala Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका (IND vs ENG) आता अखेरच्या टप्प्यात आहे. भारतीय संघाने (Team India) चौथ्या कसोटी सामन्यात (India vs England Test ) विजय मिळवत मालिका 3-1 ने खिशात घातली आहे. आता अखेरचा कसोटी सामना सात मार्चपासून धर्मशाला मैदानात रंगणार आहे. या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेईंग 11 मध्ये बदल निश्चित मानला जातोय. कारण, बूम बूम बुमराह परत येतोय. चौथ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. आता तो कमबॅकसाठी तयार झालाय. 


वर्कलोड मॅनेज करण्यासाठी रांची कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला आराम देण्यात आला होता. पण अखेरच्या कसोटी सामन्यासाठी आता बुमराह उपलब्ध असेल.  धर्मशाला येथे रंगणाऱ्या कसोटी सामन्यात सिराज आणि बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळू शकतात. आकाशदीपला बेंचवरच बसवलं जाऊ शकतं. जसप्रीत बुमराह इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत 17 विकेट घेतल्या आहेत. 


बुमराहच्या कमबॅकमुळे धर्मशाला कसोटीमध्ये आकाशदीपची प्लेईंग 11 मधून सुट्टी होण्याची दाट शक्यता आहे. रांची कसोटीत बुमराहला आराम दिल्यानंतर आकाशदीपचं पदार्पण झालं होतं. आता अखेरच्या कसोटी सामन्यात सिराज अथवा आकाशदीप यांच्यापैकी एकाला बेंचवर बसावं लागू शकतं. 


रजत पाटीदारही प्लेईंग 11 च्या बाहेर - 


रजत पाटीदार (rajat patidar) याला वगळण्यात येऊ शकतं. पाटीदार याला (Rajat Patidar) चार कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. युवा रजत पाटीदार यानं विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. पण त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत रजत पाटीदार पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याच्या जागी आता केएल राहुल अथवा देवदत्त पडिक्कल याच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. 


धर्मशालामध्ये इंग्लंड पलटवार करणार का ?


लागोपाठ तीन सामन्यात पराभवाचा सामना करणारा इंग्लंडचा संघ नव्या दमाने मैदानात उतरेल. अखेरचा सामना जिंकून इंग्लंडचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल, याच शंकाच नाही. इंग्लंडच्या अतिआक्रमक बॅझबॉल भारतीय भूमीवर सपशेल अपयशी ठरला. भारताचा हैदराबाद कसोटीमध्ये पराभव करत इंग्लंडनं दणक्यात सुरुवात केली, पण त्यानंतर भारताने पलटवार केला. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सलग तीन सामन्यात विजय मिळवला. विशाखापट्टणम कसोटीत भारताने 106 धावांनी विजय मिळवला. राजकोट कसोटी सामन्यात 434 धावांनी विजय मिळवला, त्यानंतर रांची कसोटीत पाच विकेटने मात केली. आता अखेरचा सामना जिंकून शेवट गोड कऱण्यासाठी साहेब मैदानात उतरली. तर भारतीय संघही विजयाच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.