Mumbai Win Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना मुंबई आणि मध्य प्रदेश यांच्यात खेळला गेला. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीचा अंतिम सामना मुंबईने जिंकला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा पराभव करून विजेतेपद पटकावले. अय्यरने अलीकडच्या काळात कर्णधार म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्स संघाने यंदाच्या आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. मुंबईच्या विजयात सर्वात महत्त्वाचे योगदान सूर्यकुमार यादव आणि सूर्यांश शेजेचे होते. या सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबईला विजय मिळवून दिला.






कसा झाला सामना?


दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मध्य प्रदेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला आणि कर्णधार रजत पाटीदारच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्यांनी या सामन्यात 20 षटकात 8 गडी गमावून 174 धावा केल्या. पाटीदारने या सामन्यात आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि अवघ्या 40 चेंडूत 81 धावा केल्या. त्याच्याशिवाय संघातील कोणत्याही सदस्याने विशेष काही केले नाही.






मुंबईने सहज केला पाठलाग 


हा सामना जिंकण्यासाठी मुंबईला 175 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. ज्याचा पाठलाग त्यांच्या संघाने 13 चेंडू बाकी असताना 17.5 षटकात 5 गडी गमावून 180 धावा केल्या. मुंबईने हा सामना 5 विकेटने जिंकला. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 48 धावांची खेळी केली. याशिवाय सुर्यांश शेजे याने अवघ्या 15 चेंडूत 36 धावा करत संघाचा तारणहार ठरला. सुर्यांश शेजेला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने 3 चौकार आणि 3 षटकारच्या मदतीने 6 चेंडूत 30 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना रहाणेनेही महत्त्वाची भूमिका बजावली. रहाणेला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.






हे ही वाचा -


IND vs AUS 3rd Test : ब्रिस्बेनमध्ये टीम इंडिया संकटात! ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला, बुमराहचा विकेटचा षटकार