Rohit Sharma in India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात पहिला टी20 सामना खेळवला गेला. यावेळी भारताने 68 धावांनी सामना जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली. पण याच सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक दमदार असा रेकार्ड आपल्या नावे केला आहे.रोहितने सामन्यात अर्धशतक केलं असून यासोबतच त्याने आतंरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन नावे केले आहेत. त्याने आपल्या नावावर 3 हजार 343 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलला (Martin Guptil) मागे टाकलं आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर विराट कोहली (Virat Kohli) आहे.






 


टी20 मध्ये रोहितचा नवा रेकॉर्ड


रोहित शर्माने (Rohit Sharma) वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत 64 धावा केल्या. यासोबतच त्याने 129  आतंरराष्ट्रीय टी20 सामन्यात 3 हजार 443 रन स्वत:च्या नावे केले आहेत. 32.48 च्या सरासरीने त्याने या धावा केल्या असून 118 हा त्याचा बेस्ट स्कोर आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील  (Martin Guptil) असून त्याने 116 टी20 सामन्यात 32.37 च्या सरासरीने 3 हजार 399 रन केले आहेत. तिसऱ्या नंबरवर असणाऱ्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर 3 हजार 308 रन असून त्याने या धावा केवळ 99 टी20 सामन्यात केल्या आहेत. 50.12 च्या सरासरीने कोहलीने या धावा केल्या असून 94 हा त्याचा बेस्ट स्कोर आहे.


भारताचा 68 धावांनी विजय


तर रोहित शर्माने हा रेकॉर्ड करतच सामनाही भारताला जिंकवून दिला. यासोबत त्याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला. सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने कर्णधार रोहितचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांत दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीने भारताचा डाव सावरत 190 धावा केल्या. त्यानंतर 191 धावा करण्यासाठी मैदानात आलेला वेस्ट इंडीजचा संघ 122 धावाच करु शकला. भारताच्या फिरकीपटूंनी अप्रतिम गोलंदाजी केली. ज्यामुळे वेस्ट इंडीजचा संघ 68 धावांनी पराभूत झाला.


हे देखील वाचा -