West Indies vs South Africa 2nd Test : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गयाना येथे खेळला जात आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांसमोर एकही फलंदाज काही विशेष करू शकला नाही. वेस्ट इंडिजचा युवा स्टार शामर जोसेफने पहिल्यांदाच 5 विकेट घेतल्या. तर दुसरीकडून दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डरने 18 धावांत 4 विकेट घेतल्या. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 17 विकेट पडल्या. यासह गयानामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात सर्वाधिक विकेट पडण्याचा विक्रम रचला गेला.


गोलंदाजांच्या तालावर नाचले फलंदाज


त्रिनिदाद कसोटी सामन्यात संथ खेळपट्टीनंतर फलंदाजांना गयानामध्ये वेगवान खेळपट्टी पाहायला मिळाली. या सामन्यात पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांनी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि तो चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. चौथ्या षटकातच दक्षिण आफ्रिकेने पहिली विकेट गमावली. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाही दोन चेंडूंनंतर आऊट झाला. पहिल्या ड्रिंक्स ब्रेकला दक्षिण आफ्रिकेने 20 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. एकेकाळी दक्षिण आफ्रिकेचा संघ 97 धावांत 9 विकेट गमावून संघर्ष करत होता. यादरम्यान डॅन पीट आणि नांद्रे बर्जर यांनी 63 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 160 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. वेस्ट इंडिजकडून जोसेफने 5 आणि जेडेन सील्सने 33 षटकात 3 विकेट घेतल्या.


दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनीही दाखवली ताकद


फलंदाजांच्या अपयशानंतर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांने आपली ताकद दाखवून दिली. नांद्रे बर्जर आणि विआन मुल्डर यांच्या समोर वेस्ट इंडिजचे पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. होल्डरने वेस्ट इंडिजचा डाव सांभाळला. त्याने मोतीसोबत सातव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपण्याच्या काही वेळापूर्वीच मोतीची विकेट पडली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने 7 गडी गमावून 97 धावा केल्या होत्या. जेसन होल्डर 33 धावा केल्यानंतरही क्रीजवर आहे.






ही पण वाचा -



PKL Auction: ऐतिहासिक! प्रो कबड्डीने बनवला सर्वाधिक करोडपती बनवण्याचा रेकॉर्ड, 8 जण झाले कोट्यधीश


Vinesh Phogat Coach : 'मला वाटलं ती मरेल...', त्या रात्री विनेश फोगाट सोबत काय झालं? कोचने केला धक्कादायक खुलासा