Irfan Pathan Twitter Complainet : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू स्टार क्रिकेटर इरफान पठाणसह (Irfan Pathan) त्याच्या कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर वाईट वागणूक झाल्याचा दावा त्याने केला आहे. इरफानने एअरपोर्टवरील अनुभवाबाबत आपल्या ट्वीटरवरुन ट्वीट करत तक्रार केली आहे. इरफान पठाणने सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, जवळपास 1.5 तास त्याला आणि त्याच्या कुटुंबाला विमानतळावरील चेक इन काऊंटरवर उभं राहावं लागलं होतं.


इरफान पठाण 24 ऑगस्ट रोजी दुबईसाठी रवाना होणार होता, त्यासाठी तो मुंबई एअरपोर्टवर पोहोचला. त्याच ठिकाणी अर्थात मुंबई एअरपोर्टवर त्याच्यासोबत वाईट वागणूक करण्यात आली. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''मी आज विस्तारा कंपनीच्या यूके-201 फ्लाईटने मुंबई ते दुबई असा प्रवास करणार होतो, त्यावेळी चेक इन काउंटरवर मला अतिशय वाईट अनुभव आला. माझी तिकिट कन्फर्म असतानाही विस्ताराकडून माझी तिकिट सतत डाऊन केली जात होती. ज्यामुळे मला कुटुंबासोबत 1.5 तास वाट पाहावी लागली. यावेळी माझी पत्नी, माझं 8 महिन्यांचं आणि 5 वर्षाचं मुल अशा साऱ्यांना त्रास सहन करावा लागला. ग्राऊंड स्टाफची वागणूकही वाईट होती. त्यांनी मर्यादेपेक्षा अधिक तिकिटं का विकली यामुळे माझ्यासह इतर कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.'' 


वाचा ट्वीट-






 


ट्वीटरवर अॅक्टिव्ह असतो इरफान पठाण


दरम्यान इरफान पठाण याचं हे ट्वीट तुफान व्हायरल झालं आहे. विस्तारानेही काही वेळातच या ट्वीटला रिप्लाय देत माफी मागत आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि लवकरच तुमच्या तक्रारीचं निवारण करु. तसंच आम्हाला तुमच्या तिकिटीसंबधी सर्व डिटेल द्यावी अशी विनंतीही विस्ताराने केली आहे. विशेष म्हणजे हवाई वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांनीही लगेचच या ट्वीटला रिप्लाय देत विस्ताराला या तक्रारीचं निवारण करण्याचे आदेश दिले आहेत.


हे देखील वाचा-