Irani Trophy 2024 Sanju Samson : बीसीसीआयने इराणी कप 2024 साठी रणजी चॅम्पियन मुंबई आणि 'रेस्ट ऑफ इंडिया' च्या संघांची घोषणा केली आहे. या संघांमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांची बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी निवड करण्यात आली होती. त्याचवेळी पुन्हा एकदा संजू सॅमसनकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अलीकडेच त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. असे असतानाही त्याला रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान मिळाले नाही.


संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळाली नाही


बीसीसीआयने इराणी ट्रॉफी 2024 साठी रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा केली आहे. इशान किशन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, मानव सुथार सरांश जैन, प्रसिध, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद आणि राहुल चहर यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे दोघेही सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग आहेत.


संजूने दुलीप ट्रॉफीमध्ये केली होती चांगली कामगिरी 


दुलीप ट्रॉफीमध्ये संजू सॅमसनची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याला भारत डी संघाकडून फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्याने चार डावांत 196 धावा केल्या. ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे. त्यानंतरही बीसीसीआयने त्याला इराणी ट्रॉफीमध्ये संधी दिली नाही.




रेस्ट ऑफ इंडिया -


ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर


मुंबई संघ -


अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस


हे ही वाचा - 


 IPL लिलावात 10 वेळा अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूच्या गळ्यात पडली उपकर्णधारपदाची माळ, कोण आहे हा खेळाडू?


 IND vs BAN : सरफराज खानसह हे खेळाडू होणार संघाबाहेर; BCCI म्हणाली, तुम्हाला प्लेइंग-11मध्ये स्थान मिळाले नाही तर...


 Irani Trophy 2024 Squads : BCCIची मोठी घोषणा! CSKच्या 2 स्टार खेळाडूंना दिली कर्णधारपदाची धुरा; पृथ्वी शॉ यालाही मिळाली संधी