India vs Bangladesh 2nd Test : बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता कानपूरला पोहोचला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND v BAN) 27 सप्टेंबरपासून यूपीच्या या शहरात खेळवला जाणार आहे. कानपूर कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम इंडियाच्या तीन खेळाडूंबाबत शंका निर्माण झाली आहे. हे तिन्ही खेळाडू बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळणार नसून त्यांना संघातून सोडल्या जाऊ शकते असे बोलले जात आहे.


खंरतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवार 24 सप्टेंबर रोजी इराणी कप सामन्यासाठी रेस्ट ऑफ इंडिया टीमची घोषणा केली आहे, ज्यामध्ये ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांची देखील निवड करण्यात आली आहे. म्हणजेच बीसीसीआयने हे दोन्ही खेळाडू इराणी कप सामना खेळणार असल्याची पुष्टी केली आहे, परंतु येथे गोंधळ असा आहे की बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या 16 सदस्यीय संघात या दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण हे दोघे दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग-11 मध्ये नसतील तर ते इराणी कप खेळतील, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.




त्याचप्रमाणे बीसीसीआयनेही सरफराज खानबाबत माहिती दिली आहे. सरफराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही, तर त्याला इराणी चषकासाठी राष्ट्रीय संघातूनही सोडले जाऊ शकते. तो अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाचा भाग असू शकतो. बीसीसीआयने म्हटले आहे की, "सरफराज खानला दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात कायम ठेवण्यात आले आहे. जर तो बांगलादेशविरुद्ध कानपूर येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला नाही तर त्याला मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सोडण्यात येईल." 


इराणी कप ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे आयोजित मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे. 2024 चा इराणी कप सामना मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात होणार आहे. हा सामना यावेळी 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 2023-24 रणजी ट्रॉफी चॅम्पियन मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील हा सामना लखनौच्या ऐतिहासिक एकना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयने उर्वरित भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड यांची निवड केली आहे.


रेस्ट ऑफ इंडिया टीम - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)*, इशान किशन (यष्टीरक्षक), मानव सुतार, सरांश जैन, प्रसिद्ध कृष्ण, मुकेश कुमार, यश दयाल*, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर.


मुंबईचा संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अद्धातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशू सिंग, शार्दूल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रोयस्टन डायस.