(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MS Dhoni: आयपीएस अधिकाऱ्याविरोधात धोनीची मद्रास हायकोर्टात धाव; मंगळवारी होणार सुनावणी, नेमकं प्रकरण काय?
IPL Beating Case: धोनीनं आपल्या याचिकेत संपत कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाईची मागणी केलीय.
IPL Beating Case: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आयपीएस अधिकारी संपत कुमार (Sampath Kumar) यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) याचिका दाखल केलीय. धोनीनं आपल्या याचिकेत संपत कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालय आणि काही वरिष्ठ वकिलांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाईची मागणी केलीय. हे प्रकरण आयपीएलवरील सट्ट्याच्या संदर्भातील असून धोनीच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
धोनीनं 2014 मध्ये तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी धोनीशी संबंधित कोणतेही वक्तव्य करण्यापासून रोखण्यासाठी दिवाणी खटला दाखल केला होता. तसेच त्यानं 100 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्याचीही विनंती न्यायालयाला केली होती. दरम्यान, न्यायालयानं 18 मार्च 2014 रोजी संपत कुमारला धोनीविरोधात कोणतंही वक्तव्य करण्यापासून रोखत अंतरिम आदेश दिला. मात्र, त्यानंतरही संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून न्यायपालिका आणि त्यांच्याविरोधात राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ वकिलाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली.
ट्वीट-
Former Indian skipper MS Dhoni files contempt of court plea against IPS officer in Madras HC
— ANI Digital (@ani_digital) November 5, 2022
Read @ANI Story | https://t.co/oYr26bLRQ9#MSDhoni #ContemptofCourt #IPLBetting pic.twitter.com/zheQIACAo6
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 10 हजार 773 धावांची नोंद आहे. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
आयसीसीच्या तीन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.
हे देखील वाचा-