IPL Auction Update: आयपीएलच्या आगामी 15 व्या हंगामात नवे दोन संघ येणार असून जुन्या काही संघानांही नवा कर्णधार पाहावा लागणार आहे. दरम्यान स्टार क्रिकेटपटू हार्दीक पंड्याला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नसल्याने तो नव्या संघात जाण्याची अधिक शक्यता असून यावेळी त्याला कर्णधारपदही मिळू शकतं. एएनआयने याबाबत ट्वीट केलं आहे.



भारतीयांचा आवडीचा खेळ असणारा क्रिकेट देशभरात लोकप्रिय आहे. या खेळातील सर्वात आवडती स्पर्धा म्हणजे, इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल काही महिन्यांत पार पडणार आहे. आयपीएलच्या (IPL) पंधराव्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झाला आहे. लखनौ आणि अहमदाबाद या संघाचा समावेश झाला आहे त्यामुळे लीगमध्ये यंदा 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. दरम्यान या स्पर्धेत नव्या संघाचं कर्णधारपद कोणाला मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न असून याशिवाय आणखी काही संघानाही नवा कर्णधार मिळणार आहे. यामध्ये बंगळुरु, पंजाब, कोलकाता या संघाचा समावेश असून यातील अहमदाबाद आणि बंगळुरु संघाचा कर्णधार म्हणून हार्दीक पंड्याचं नाव समोर येत आहे.


एएनआयने याबाबत ट्वीट केलं असून मूळचा गुजरातचा असणाऱ्या हार्दीककडे गुजरातचा संघ अहमदाबादचं कर्णधारपद मिळू शकतं. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकतं. शिवाय बंगळुरू संघाचं कर्णधारपद विराटने सोडल्याने आता याजागीही नवा कर्णधार नेमला जाणार आहे. याजागीही पंड्याच्या नावाची चर्चा आहे. 


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha