Mumbai Indians Captain IPL 2025 : आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावानंतर सर्व संघ बदललेले दिसतील. मुंबई इंडियन्समध्येही अनेक बदल पाहायला मिळतील. यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो. रिपोर्टनुसार, रोहित शर्मासह टीमचे अनेक खेळाडू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर खूश नाहीत. यासोबतच सचिन तेंडुलकरही सूर्याला कर्णधार बनवण्याच्या बाजूने आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितसोबत आलेल्या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटला अल्टिमेटम दिला आहे. रोहित आणि सचिनसह अनेक खेळाडूंना पांड्याने कर्णधारपदी राहावे असे वाटत नाही. मुंबईने हार्दिकला अजूनही कर्णधारपदावर ठेवले तर रोहित आणि सूर्याशिवाय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही संघ सोडू शकतो. यामुळे मुंबई कॅम्पमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.
मुंबईने रोहितला न सांगता घेतला होता निर्णय
मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समध्ये ट्रेड केले आणि त्याला संघात परत आणले. यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वीच एमआयने रोहितला हटवून पांड्याला संघाचा कर्णधार बनवले. रिपोर्टनुसार, मुंबईने या निर्णयाबाबत रोहितला कोणतीही माहिती दिली नाही. त्याचा परिणाम आयपीएल 2024 मधील मुंबईच्या सामन्यांवरही दिसून आला. यामुळे रोहित आणि त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते.
जय शाह हार्दिक पंड्याच्या बाजूने
हार्दिक पांड्या टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनणार होता. पण हे होऊ शकले नाही. त्याच्या जागी सूर्याला कर्णधारपद देण्यात आले. रिपोर्टनुसार, जय शाह पांड्याच्या बाजूने होते. मात्र अजित आगरकर तसेच इतर अधिकारी याला सहमत नव्हते. जय शाहमुळेच पांड्या काही काळ उपकर्णधार राहिला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
हे ही वाचा :
'एका रात्रीत लॉकडाऊन, नोटाबंदी, मग फाशी का नाही...' महिला अत्याचारावरुन टीम इंडियाच्या खेळाडूच्या पत्नीचा संताप
Pak vs Ban 1st Test : रावळपिंडीच्या मैदानावर पाकिस्तानने खाल्ली माती! बांगलादेशने रचला मोठा इतिहास