Dhanashree Verma on Kolkata Rape Case : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्ट रोजी झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सूंपर्ण देशभरात खळबळ उडाली. या क्रूरतेनंतर देशातील अनेक भागांतून निदर्शने होत आहेत. या मुद्द्यावर अनेक क्रिकेटपटूंनी आपला विरोधही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आता भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचे नावही जोडले गेले आहे. धनश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मोठी मागणी केली आहे.


देशातील वाढत्या घटनांविरोधात धनश्रीची पोस्ट


युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. धनश्रीने नुकतेच इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांविरोधात आवाज उठवला आहे. बलात्काराच्या आरोपींना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. 


धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'नोटाबंदी एका रात्रीत होऊ शकते, लॉकडाऊन एका रात्रीत लागू होऊ शकते, मग एका रात्रीत बलात्कार करणाऱ्याला फाशी का दिली जाऊ शकत नाही.'


याआधी युझवेंद्र चहलनेही या प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चहल म्हणाला होता की, 'त्याला फाशी द्यावी का? तर नाही. खरंतर, त्याचे पाय 90 अंशाच्या कोनात मोडले पाहिजेत. त्याची कॉलरबोन्स तुटली पाहिजे आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टलाही इजा केली पाहिजे. बलात्काराच्या आरोपींना असह्य वेदना होईपर्यंत जिवंत ठेवा आणि शेवटी त्यांना फाशी द्या. मात्र, काही वेळाने त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली ही स्टोरी डिलीट केली. पण स्क्रीनशॉट खूप व्हायरल झाला.


या खेळाडूंनीही संताप केला व्यक्त 


या जोडप्याच्या आधी सौरव गांगुली, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर हे भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांनी बलात्कार-हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्या म्हणाला होता, 'तुमच्या मुलांना शिक्षित करा. तुमचे भाऊ, तुमचे वडील, तुमचे पती आणि तुमच्या मित्रांना शिक्षित करा.


हे ही वाचा :


Joe Root : जो रूटने एका दगडात मारले दोन पक्षी; 'क्रिकेट'च्या देवाचा विश्वविक्रम धोक्यात


Virat Kohli On Shikhar Dhawan Retirement  : "भारताचा सर्वात विश्वासार्ह..." धवनच्या निवृत्तीवर कोहलीची जबरदस्त प्रतिक्रिया; काही मिनिटांत व्हायरल