एक्स्प्लोर

IPL 2025 MS Dhoni: आयपीएलमध्ये 'माही' पुन्हा येणार, पण यंदा करोडो रुपयांचं नुकसान होणार; BCCI चा नियम एमएस धोनीला परवडणार?

IPL 2025 MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. 

IPL 2025 MS Dhoni: आयपीएल संचालन परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक 29 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत आयपीएलबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनकॅप्ड प्लेअरबाबतही बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सकडून एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. 

आयपीएलमधील (IPL) फ्रँचायझी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहे. परंतु त्यानंतर लिलावासाठी तुमच्याकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना उर्वरित 20 खेळाडू खरेदी करावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल. अनकॅप्ड खेळाडू कोणत्याही देशाचा असू शकतो. त्यामुळे एमएस धोनी (MS Dhoni) यंदाच्या आयपीएलच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. मात्र एमएस धोनीला फक्त 4 कोटी रुपये मिळतील. 

एमएस धोनीला यंदा करोडो रुपयांचं नुकसान-

एमएस धोनीला आयपीएल 2024 मध्ये खेळण्यासाठी 12 कोटी रुपये मिळाले होते, परंतु अनकॅप्ड खेळाडूचे कमाल वेतन 4 कोटी रुपये आहे. याचा अर्थ अनकॅप्ड खेळाडू झाल्यावर धोनीचा पगार तीन पटीने कमी होईल. गतवर्षी धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आणि संघाची कमान रुतुराज गायकवाडकडे सोपवली. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ गेल्या वर्षी गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता.

काय आहे अनकॅप्ड खेळाडूचा नियम?

आता आयपीएलमध्ये जर एखादा खेळाडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, त्याचा मेगा लिलावात अनकॅप्ड खेळाडू म्हणून समावेश होईल. आयपीएलमध्ये हा नियम आधी लागू होता. मात्र 2022 च्या लिलावापूर्वी आयपीएलच्या समितीने या निर्णयावर बंदी घातली होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये धोनी लिलावात आल्यास अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश होईल. एमएस धोनीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता, तर 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता.

दोन वर्षांची बंदी-

आयपीएलच्या गेल्या अनेक मोसमात लिलावात निवड झाल्यानंतर काही खेळाडूंनी हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार दिल्याचे दिसून येत होते. आता याबाबतही एक नियम जाहीर करण्यात आला आहे, ज्यामध्ये लिलावात एखादा खेळाडू निवडला गेला आणि नंतर त्याने खेळण्यास नकार दिला तर त्या खेळाडूला स्पर्धेत भाग घेण्यास बंदी घालण्यात येईल आणि खेळाडूंच्या लिलावातही 2 वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे.

संबंधित बातमी:

IPL 2025: रोहित-विराटने नाराजी व्यक्त केलेल्या आयपीएलमधील 'Impact Player' नियमाचं काय होणार?;  BCCIने केलं जाहीर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ICMR on Antibiotics : अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
PM Modi: 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,".... तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrakant Patil Pune Speech : पुणे मेट्रो उद्घाटन सोहळा कार्यक्रमात पाटील यांचा विरोधकांना टोलाManoj Jarange :ठाकरे, मुंडेंनंतर जरांगेंचाही दसरा मेळावा? नारायणगडावर हजर राहण्याचे संकेतChhagan Bhujbal Pune Speech : सावित्रीबाईंच्या कामाचा उजाळा; छगन भुजबळ यांचं पुण्यात भाषणNarendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वंदे भारतला हिरवा झेंडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
काल थोरल्या पवारांकडून मोठे संकेत, आज रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ICMR on Antibiotics : अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
अँटीबायोटिक्सने फरक पडेना, नवीन औषध 10 पटीने महागली; न्यूमोनिया-रक्तसंसर्ग आजारांमध्ये धोका वाढला!
PM Modi: 'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
'आधीच्या सरकारमुळे महाराष्ट्रासह देशाचं मोठं नुकसान'; PM मोदींनी पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमातून डागली तोफ
Manoj Jarange: मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,
मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंचा अमित शाहांना थेट इशारा, म्हणाले,".... तर तुमचा राजकीय एन्काउंटर होईल"
Nilesh Lanke : 'शाहांना म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलोय', निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील 'तो' रंजक किस्सा, जयंत पाटलांनाही हसू आवरेना!
'शाहांना म्हणालो तुमच्या या नेत्यांना पाडून आलोय', निलेश लंकेंनी सांगितला संसदेतील 'तो' रंजक किस्सा, जयंत पाटलांनाही हसू आवरेना!
Who is Hassan Nasrallah : 80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
80 टनाच्या बाॅम्बने खात्मा; कोण होता नसराल्लाह? इस्रायलशी 50 वर्षे शत्रुत्व, भाजी विक्रेत्याच्या घरात जन्म, वयाच्या 15व्या वर्षी ज्यूंविरुद्ध उचलले शस्त्र
Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवत केलं लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
पुण्यातील भूमिगत मेट्रोला मोदींनी हिरवा झेंडा दाखवत केलं लोकार्पण! तिकीट काय असणार; जाणून घ्या सामान्यांना प्रवास परवडणार का?
Devendra Fadnavis: 'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
'काहींनी छात्या बडवल्या', मेट्रोचं लोकार्पण लांबल्याने मविआने केलेल्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, 'आधी एक पिलर...'
Embed widget