IPL 2022 : क्रिकेटचा महासंग्राम आयपीएल (IPL 2022) सध्या सुरु असून अनेक युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. मुंबई इंडियन्स संघातून खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्मा (Tilak Varma) याने देखील क्लासिक खेळ दाखवत स्वत:चं नाव केलं आहे. त्यामुळेच त्याच्या या खेळीचं कौतुक महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केलं आहे. 'तिलकला योग्य क्रिकेटचं ज्ञान असून तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू शकतो', असंही ते म्हणाले आहेत.
गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या शोमध्ये बोलताना तिलकचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, "तिलक वर्माने यंदाच्या हंगामात दिलासादायक अशी कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने केलेली विजयी खेळी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. तिलक संपूर्ण मैदानात फटकेबाजी करु शकतो, स्ट्राईक रोटेट करण्याचं कसबही त्याच्यात आहे. त्यामुळे भविष्यात भारतासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो एक चांगला फलंदाज होऊ शकतो ''
तिलक वर्मा आयपीएल 2022 मध्ये
मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकलेला एक युवा तारा आहे. तिलकने हंगामातील 12 सामन्यात 40.89 च्या सरासरीने आणि 132.85 च्या स्ट्राइक रेटने 368 रन केले आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही 7 व्या स्थानावर आहे. तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.
तिलकनं मोडला पंतचा विक्रम
तिलक वर्माने आतापर्यंत 12 सामन्यात 368 धावांचा पाऊस पाडलाय. तिलक वर्मा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा काढणारा टीन एजर खेळाडू बनलाय. तिलक वर्माने पाच वर्षापूर्वीचा ऋषभ पंतचा (Rishabh Pant) विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये दिल्लीकडून खेळताना पंतने 14 सामन्यात 366 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉने 2019 साली 16 सामन्यांत 353 धावा चोपल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचा विक्रम तिलक वर्माने मोडला आहे. मुंबईने तिलक वर्माला एक कोटी 70 लाख रुपयांत विकत घेतले होते. यंदाच्या हंगमात मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये तिलक वर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तिलक वर्माने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनाही मागे टाकलेय.
हे देखील वाचा-
- Axar Patel : आयपीएलमध्ये अक्षर पटेलची खास अष्टपैलू कामगिरी, ही कामगिरी करणारा जगाचीस चौथाच खेळाडू
- Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सनं पुन्हा शेअर केला अर्जुन तेंडुलकरचा फोटो, फॅन्स म्हणतात 'एक तरी मॅच खेळवा भावाला'
- IPL 2022: मुंबईच्या संघात मोठा बदल, सूर्यकुमार यादवच्या जागेवर 'या' खेळाडूचा संघात समावेश