Brett Lee on Andrew Symonds: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्रयू सायमंड्सचं रविवारी अपघातात निधन झालं. तो 46 वर्षांचा होता.  त्याच्या निधनाची बातमी क्रिडाविश्वासाठी मोठा धक्का होता. अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी अँड्रयू सायमंड्सला श्रद्धांजली वाहली आहे. याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं भावनिक ट्वीट करत अँड्रयू सायमंड्सला श्रद्धांजली वाहली आहे. ब्रेट ली आणि अँड्रयू सायमंड्स एकमेकांसोबत दिर्घकाळ क्रिकेट खेळलं आहे. हे दोन्ही खेळाडू बराच काळ ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होते.


ब्रेट लीचं ट्वीट- 


https://twitter.com/BrettLee_58/status/1525954573898113024


अँड्रयू सायमंड्सला श्रद्धांजली वाहत ब्रेट लीनं ट्विटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं म्हटलं आहे की, मी 17 वर्षांच्या होतो, तेव्हापासून रॉयला ओळखायचो. तो सर्वात प्रभावशाली एथलीट्स पैकी एक होता, ज्यांना मी पाहिलं आहे. तो पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी खेळला नाही. या गोष्टींना तो जास्त महत्व देत नव्हता. जोपर्यंत त्याच्या गरजा पूर्ण होत होत्या आणि त्याला प्यायला थंड बिअर मिळत होती तोपर्यंत तो आनंदी होता. कोणत्याही संघात त्याची प्रथम निवड होईल, असा तो होता. 


अँड्रयू सायमंड्सची कारकिर्द
जगातील अव्वल दर्जाच्या अष्टपैलू खेळाडूंची जेव्हाही यादी बनेल त्यात सायमंड्सचं नाव नक्कीच वरच्या फळीत असेल. सायमंड्सचं क्रिकेट करिअर अतिशय शानदार होतं. त्याने 198 वनडे सामन्यांमध्ये 5088 रन बनवले. यामध्ये सहा शतकं आणि 30 अर्ध शतकांचा समावेश आहे. सायमंड्स ऑल राऊंडर क्रिकेटपटू असल्याने त्याने वनडे फॉर्मेटमध्ये त्याने 133 विकेटही घेतल्या. तसेच 26 टेस्ट मॅचमध्ये 1462 रन काढण्याची कामगिरी केली आहे. शिवाय 24 विकेटही घेतल्या आहेत. सायमंड्स 14 टी 20 सामने खेळले.  


ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी यंदाचा वर्ष कठीण ठरतंय
ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हे वर्ष फारच कठीण ठरतंय. या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज क्रिकेटपटूंचं निधन झालंय. अवघ्या दोन महिन्यांत ऑस्ट्रेलियाने तीन दिग्गज गमावले आहेत. अ‍ॅन्ड्र्यू सायमंट्स, शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांच्या जाण्याने क्रिकेट जगताची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे.


हे देखील वाचा-