IND vs IRE : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नुकताच भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) सामन्यांसाठी संघ जाहीर केला. यावेळी संजू, सूर्यकुमार या दिग्गजांच्या संघात पुनरागमनासह आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) पहिल्यांदाच भारतीय संघात निवडला गेला आहे. कोणत्याही क्रिकेटपटूसाठी भारतीय संघाचं तिकीट मिळणं अत्यंत मोठी गोष्ट असून अखेर हा दिवस राहुलच्या नशिबात आला आहे.
विशेष म्हणजे या मालिकेपूर्वी बीसीसीआयने (BCCI) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्याआधी राहुल त्रिपाठीने यंदाच्या आयपीएलमधील 14 सामन्यात 37.55 च्या सरासरीने आणि 158.24 च्या स्ट्राईक रेटने 413 रन केले होते. त्याने काही सामने संघाला एकट्याच्या जीवावार जिंकून दिले होते. दरम्यान आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुनही राहुल त्रिपाठीला संघात संधी मिळाली नव्हती. ज्यानंतर त्याच्या चाहत्यांसह काही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली होती. पण आता राहुलला संघात स्थान मिळालं असून त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळेल का? आणि मिळाल्यास तो कशी कामगिरी करेल यावरही सर्वांचे लक्ष असेल.
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 26 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
दुसरा टी20 सामना | 28 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
हे देखील वाचा-