India Squad for Ireland Tour : दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशातील मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 26 जूनपासून आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलेय. 17 जणांच्या संघामध्ये राहुल त्रिपाठीला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय सुर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांचं पुनरागमन झालेय. निवड समितीने पुन्हा एकदा पृथ्वी शॉला संधी दिली नाही. विस्फोटक सलामी फलंदाज मागील काही दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही पृथ्वी शॉची भारतीय संघात निवड झालेली नाही, त्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले होते.
आयपीएल 2022 मध्ये गुजरातला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलेय. तर अनुभवी भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार कऱण्यात आलेय. पण प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीही पृथ्वी शॉला संधी दिली नाही. पृथ्वी शॉ गेल्यावर्षी श्रीलंकाविरोधात भारतीय संघाचा भाग होता. आयपीएल 2022 मध्ये पृथ्वी शॉने दमदार कामगिरी केली होती, तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने धावांचा पाऊस पाडला. त्यानंतरही पृथ्वीला संघात स्थान मिळाले नाही. पृथ्वी शॉची निवड न झाल्यामुळे नेटकरी चांगलेच भडकले. ट्विटरवर पृथ्वी शॉ ट्रेंड करत होता. पाहूयात कोण काय म्हणाले..
आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक
भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 26 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
दुसरा टी20 सामना | 28 जून | डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड |
हे देखील वाचा-