IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. तर, या हंगामातील अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघानं त्यांची नवीन जर्सी लाँच केलीय. 


दिल्ली कॅपिटल्सनं अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या संघाची जर्सी लॉंच केलीय. दिल्लीच्या नव्या जर्सीच्या पुढील बाजूस गर्जना देणाऱ्या वाघाचा लोगो लावण्यात आला आहे. मागच्या बाजूला वाघाच्या पंजाच्या खुणा आहेत.


दिल्ली कॅपिटल्सची जर्सी-



भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं कर्णधारपद संभाळत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ आयपीएलचा खिताब जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दिल्लीच्या संघाला अद्याप एकदाही आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही.


दिल्लीचा संघ-
 रिषभ पंत (16 कोटी), अक्षर पटेल (9 कोटी), पृथ्वी शॉ (7.5 कोटी), एनरिच नॉकिया (6.5 कोटी), डेव्हिड वॉर्नर (6.5 कोटी), मिचेल मार्श (6.5 कोटी), शार्दूल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी), अश्विन हेब्बर (20 लाख), सरफराझ खान (20 लाख), कमलेश नागरकोटी (1.10 कोटी), केएस भरत (2 कोटी), मनदीपसिंग (1.10 कोटी), खलिल अहमद (5.25 कोटी), चेतन साकरिया (4.20 कोटी), ललित यादव (65 लाख), रिपल पटेल (20 लाख), यश धुल (50 लाख), रोवमन पॉवेल (2.80 कोटी), प्रवीण दुबे (50 लाख). 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha