ICC Women's World Cup 2022: हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) सुरू असलेल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीज (Ind Vs WI) संघासमोर 318 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरनं वेस्ट इंडीजच्या आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळं भारताला वेस्ट इंडीजच्या संघासमोर विशाल लक्ष्य ठेवता आलं आहे. वेस्ट इंडीजचा संघ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यामुळं आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून स्मृती मानधना आणि यस्तीका भाटिया सलामी देण्यासाठी मैदानात उतरल्या. मात्र, या सामन्यातील सहाव्या षटकात यस्तीका भाटीया (31 धावा) बाद झाली. त्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार मिताली राजलाही काही खास कामगिरी करता आली नाही. तिनं नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर 5 धावांवर असताना आपली विकेट्स गमावली. मिताली पाठोपाठ दिप्ती शर्माही स्वस्तात माघारी परतली. तिला या सामन्यात केवळ 15 धावा करता आल्या. दरम्यान, एकाबाजूनं संयमी खेळी करणाऱ्या स्मृती मानधनाला हरमनप्रीत कौरची साथ मिळाली. या दोघांनी तडफदार शतक ठोकून भारताचा स्कोर 300 पार पोहचला. भारतानं 50 षटकात 8 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून  अनिसा मोहम्मदनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, हेली मॅथ्यूज, शकेरा सेलमॅन, डॉटीन आणि आलिया अॅलीनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली आहे. 


प्लेईंग इलेव्हन-


भारत: यास्तिका भाटिया, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड.


वेस्ट इंडीज: डिआंड्रा डॉटिन, हेली मॅथ्यूज, किसिया नाइट, स्टॅफनी टेलर (कर्णधार), शेमेन कॅम्पबेल (विकेटकिपर), चेडियन नेशन, चिनेल हेन्री, आलिया अॅलेने, शमिलिया कोनेल, अनीसा मोहम्मद, शकेरा सेलमन.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha