IND Vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 चा (ICC Women's World Cup 2022) 10 वा सामना हॅमिल्टन (Hamilton) सेडन पार्क (Seddon Park) येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 50 षटकात 8 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. भारताला या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन्ही खेळाडूंनी चौथ्या विकेटसाठी शतकासह विक्रमी 184 धावांची भागीदारी केली. महिला विश्वचषकातील कोणत्याही विकेटसाठी भारताची ही सर्वोच्च भागीदारी आहे. 


वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर यस्तिका भाटियानं तडाखेबाज फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. यस्तिका बाद झाल्यानंतर मिराज 5 तर, दिप्ती शर्मा 15 धावा करून स्वस्तात माघारी परतली. भारतानं 78 धावांवर तीन विकेट्स गमवाले. मात्र, त्यानंतर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरनं संघाचा डाव सावरला. मानघनानं 119 चेंडूंत 13 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 123 धावा केल्या. तर, हरमनप्रीत कौरनं 107 चेंडूंत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या.


महिला विश्वचषकातील भारताची सर्वात मोठी भागीदारी
स्मृती मानधाना आणि हरमनप्रीत कौर- 184 धावा (2022)
पूनम रावत आणि थिरुश कामिनी- 175 धावा (2013)
पूनम रावत आणि मिताली राज- 157 धावा (2017)


भारतानं वेस्ट इंडीजच्या संघासमोर 318 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. वेस्ट इंडीजचा संघ आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. यामुळं आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाज कशी कामगिरी बजावतात? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha