Rishabh Pant: भारतीय संघाचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला महागडे घड्याळं स्वस्तात खरेदी करण्याचा मोह महागात पडला आहे.हरियाणाच्या एका क्रिकेटपटूनेच ऋषभ पंतला फसवणूक केली आहे. त्यानं ऋषभ पंतला 1.63 कोटीचा चुना लावला आहे.  मृणांक सिंह (Mrinank Singh) नावाच्या या क्रिकेटपटूला पोलिसांनी या महिन्यात दुसऱ्या प्रकरणात अटक केली होती. तो आता मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.दिल्लीच्या एका कोर्टानं मृणांक सिंहला हजर करण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये एक नोटीस पाठवली होती. 


मिळालेल्या माहितीनुसार, मृणांकनं जानेवारी 2021 मध्ये पंत आणि त्याच्या मॅनेजरला महागड्या घड्याळं, बॅग आणि दागिनं इत्यादी खरेदी आणि विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केल्याचं सांगितलं. त्यावेळी मृणांकनं इतर  खेळाडूंनाही घड्याळ आणि स्मार्टफोन स्वस्तात विकल्याचा खोटा दावा केला. दरम्यान,  ऋषभ पंतनं त्याच्यावर विश्वास ठेवला. ऋषभ पंतला फ्रॅन्क मुलर वॅनगार्ड याचिंग सीरिजचं घड्याळ विकत घ्यायचं होतं, यासाठी त्यानं 36,25,120 रुपये दिले. याशिवाय, रिचर्ड मिलच्या एका घड्याळासाठी त्यानं 62,60,000 रुपये आणखी दिले होते.


नेमकं प्रकरण काय?
मृणांकवर एका व्यापाऱ्याची स्वस्तात महागडं घड्याळ आणि मोबाईल देतो सांगून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याला अटकही करण्यात आली. पंतनं त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात बाऊन्स चेकच्या माध्यमातून पंतची 1 कोटी 63 लाख रुपयांची फसवणूक झाली, असा दावा पंतच्या मॅनेजरने केलाय. मृणाकनं ऋषभ पंतला कोट्यवधी रुपयांची घड्याळं स्वस्तात मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं, यादरम्यान त्यानं भारतीय संघातील अनेक खेळाडूंचा हवाला देऊन पंतचा विश्वास जिंकला होता.


हे देखील वाचा-