INDW Vs AUSW : भारतीय महिला क्रिकेट टीम  (Indian Women's Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीममध्ये झालेला दुसरा सामना जरी ऑस्ट्रेलियाने (Australia) जिंकला असला तरी या सामन्याच्या निकालावरुन आता वाद निर्माण झालाय. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला 3 धावांची गरज असताना त्या चेंडूला अंपायरने 'नो बॉल' दिला आणि ऑस्ट्रेलियाला फ्री हिट दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हारलेला सामना पुन्हा सहज जिंकला. 


भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघादरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजयाची संधी होती. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला 3 धावांची गरज असताना भारताची झुलन गोस्वामी बॉलिंग करत होती. झुलनने टाकलेला शेवटचा चेंडू हा ऑस्ट्रेलियाची बॅट्समन बेथ मूनीच्या बॅटला लागून मिडविकेटवर उभ्या असलेल्या फील्डरच्या हातात आला. 


अंपायरच्या निर्णयाने सामना पलटला
भारतीय संघाने विजयाचा जल्लोश सुरु केल्यानंतर फील्ड अंपायरने थर्ड अंपायरला या चेंडूबद्दल विचारलं आणि झुलनने टाकलेला तो शेवटचा चेंडू नो बॉल दिला. सोबतच सामना हारलेल्या ऑस्ट्रेलियाला फ्री हिट मिळाली. या संधीचा फायदा घेऊन ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. पण अंपायरच्या या निर्णयावर अनेक स्तरातून टीका केली गेली.


 






सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतंय की झुलन गोस्वामीने टाकलेला शेवटचा चेंडू हा लिगल चेंडू होता, तो अगदीच खाली होता. पण अंपायरने कोणत्या आधारावर हा नो बॉल दिला असा प्रश्न अनेकांनी विचारला. 


संबंधित बातम्या :