Hyderabad vs Punjab: शारजाहमध्ये खेळवण्यात आलेल्या आयपीएल 2021 च्या 37 व्या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला पाच धावांनी पराभव केला आहे. पंजाबने सात गडी गमावून 125 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हैदराबादला सात विकेट गमावत 120  धावांपर्यंत मजल मारता आली.



हैदराबादसाठी जेसन होल्डरने 29 चेंडूमध्ये पाच षटकारांसह नाबाद 47 धावा केल्या. पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. पंजाबचा या हंगामातील हा चौथा दिवस आहे. आतापर्यंत पंजाबने 10 सामने खेळले आहे. आजच्या विजयासह पंजाब गुणतालिकेत 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये  पंजाबकडून अपेक्षा आहेत.



 या अगोदर आयपीएल 2020 मध्ये पंजाब किंग्जने सनरायजर्स हैदराबाद विरोधात  126 धावा केल्या होत्या. आणि आज पुन्हा इतिहासाची पुनारावृत्ती करत हैदराबाद विरुद्ध 125 धावा केल्या आहे. आयपीएलच्या इतिहासात शारजाहच्या मैदनावरील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. तर आयपीएलच्या इतिहासात पंजाब किंग्जने दुसऱ्यांदा सर्वात कमी स्कोअर केला आहे.


आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याचे संपूर्ण वेळापत्रक  (IPL 2021 Second Phase Mumbai Indians Schedule) 



  • 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स  ( सायं. 7.30)

  • 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज  ( सायं. 7.30 )

  • 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )

  • 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )

  • 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब   ( सायं. 7.30 )

  • 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    ( सायं. 7.30)

  • 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज   (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज  ( सायं. 7.30)

  • 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स   ( सायं. 7.30)

  • 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज  (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1

  • 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर

  • 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2

  • 15 ऑक्टोबर फायनल