IND W vs AUS W 3rd T20: भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियानं 9 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना कमालीचा अटीतटीचा झाला, अखेर सुपर ओव्हर झाल्यानंतर भारतानं सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. ज्यानंतर आज तिसरा सामना खेळवला जात आहे.  आजचा सामना जिंकून मालिकेत मजबूत पकड बनवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत.


कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?


भारतीय महिला संघ:


स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, अंजली सरवाणी, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड


ऑस्ट्रेलिया महिला संघ:

अ‍ॅलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशलेग गार्डनर, एलिस पेरी, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन


कसा आहे आजवरचा इतिहास?


भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात आजवर झालेल्या सामन्यांचा विचार करताआतापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18 सामने जिंकले आहेत. तर, भारताला फक्त सात सामन्यात विजय मिळवता आलाय. यातील एक सामना अर्निर्णित ठरलाय. ही आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पारडं जडं दिसत आहे. 


दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हर


मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 187 धावापर्यंत मजल मारता आली. त्यानंतर सुपरओव्हर सामन्यात स्मृती मानधना रिचा घोष यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियासमोर 21 धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर भारताची वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूरनं भेदक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. ज्यामुळं सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं लागला. या विजयासह भारतानं पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधलीय. 


हे देखील वाचा-