IPL 2023  Mini Auction: आयपीएलच्या सोळाव्या हंगामापूर्वी येत्या 23 डिसेंबरला कोची (Kochi) येथे मिनी ऑक्शन होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 2.30 वा. मिनी ऑक्शनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या आयपीएलसाठी अफगाणिस्तानचा 15 वर्षीय फिरकी गोलंदाजी अल्लाह मोहम्मदनं (Allah Mohammad Ghazanfar) मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केलीय. यंदाच्या मिनी ऑक्शमध्ये नोंदणी करणारा अल्लाह मोहम्मद सर्वात तरुण खेळाडू असेल. मोहम्मदनं यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्येही आपलं नाव नोंदवलं होतं. परंतु, कोणत्याही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली लावली नव्हती.भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मोहम्मदचा आवडता गोलंदाज आहे. मोहम्मद हा अतिशय प्रभावी फिंगर स्पिनर आहे. अशा स्थितीत स्पिनरच्या शोधात अनेक फ्रँचायझी त्याच्यावर बोली लावू शकतात. त्याची मूळ किंमत 20 लाख रूपये आहे. 


मोहम्मद भारतीय रविचंद्रन अश्विनपासून प्रेरित आहे.आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनसाठी नोंदणी केल्यानंतर काबूल येथील स्पोर्टस्टारशी बोलताना मोहम्मद म्हणाला की “ रविचंद्रन अश्विन भारताचा स्टार फिरकीपटू आहे आणि मला त्याची विविधता आवडते. मी त्याला नेहमीच माझे प्रेरणास्थान मानले आहे". गझनफरने मंगळवारी काबूल येथील स्पोर्टस्टारला सांगितले.


या देशांतील खेळाडूंचा आयपीएलमध्ये समावेश
कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे एकूण 273 खेळाडू असतील. तर, इंग्लंडचे 27 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 22 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू, न्यूझीलंडचे 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे 4 खेळाडू, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू, नामिबियाचे 2 खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आलाय. 


132 विदेशी खेळाडूंची निवड 
सुरुवातीला सर्व संघांनी 369 खेळाडूंची निवड केली होती. परंतु, 36 खेळाडूंच्या विनंतीनंतर त्यांचा मिनी ऑक्शनमध्ये समावेश करण्यात आला. महत्वाचे म्हणजे, 405 पैकी 273 खेळाडू भारतीय असतील. तर, 132 खेळाडू विदेशी आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये चार खेळाडू सहयोगी देशाचे आहेत. एकूण 119 कॅप्ड आणि 282 अनकॅप्ड खेळाडूंची निवड करण्यात आली. एकूण 87 खेळाडू खरेदी केले जाणार असून त्यात 30 खेळाडू परदेशी असतील. 19 परदेशी खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत कमाल दोन कोटी रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला. 11 खेळाडूंनी स्वतःची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवली आहे.


हे देखील वाचा-