IPL 2023 Mini Auction :यपीएल लिलाव 2023 (IPL 2023) काही दिवसांत म्हणजेच 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयोजित केला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. या मिनी लिलावासाठी जवळपास सर्व फ्रँचायझी तयार आहेत. यंदा लिलावासाठी 405 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये 21 खेळाडू हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. जागतिक क्रिकेटमधील एक आघाडीचा संघ म्हणून ऑस्ट्रेलियाची ओळख असल्याने त्यांचे खेळाडू विकत घेण्यासाठी संघामध्ये चुरस असते. तर कोणत्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची बेस प्राईस किती असेल हे पाहूया...


ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि त्यांची बेस प्राईस


कॅमेरून ग्रीन - 2 कोटी रुपये


झ्ये रिचर्डसन - 1 कोटी 50 लाख रुपये


अॅडम झाम्पा - 1 कोटी रुपये


लेन्स मॉरिस - 30 लाख रुपये


ट्रॅव्हिस हेड - 10 लाख रुपये


डॅनियल सॅम्स - 75 लाख रुपये


रिले मेरेडिथ - 1 कोटी 50 लाख रुपये


बेन मॅकडरमॉट - 50 लाख रुपये


जोशुआ फिलिप - 75 लाख रुपये


पीटर हॅटझालो - 20 लाख रुपये


ख्रिस लिन - 2 कोटी रुपये


शॉन अॅबॉट - 1 कोटी रुपये


बेन ड्वॉरिस - 50 लाख रुपये


बिली स्टॅनलेक - 50 लाख रुपये


अँड्र्यू टाय - 1 कोटी रुपये


मोझेस हेन्रिक्स - 1 कोटी रुपये


डार्सी शॉर्ट - 75 लाख रुपये


नॅथन कुल्टर-नाईल - 1 कोटी 50 लाख रुपये


नॅथन मॅकड्रू - 20 लाख रुपये


हेडन केर - 20 लाख रुपये


जॅक प्रेस्टविज - 20 लाख रुपये


या देशांतील खेळाडूंचा IPL ऑक्शनमध्ये समावेश
कोची येथे होणाऱ्या या मिनी ऑक्शनमध्ये भारताचे एकूण 273 खेळाडू असतील. तर, इंग्लंडचे 27 खेळाडू, दक्षिण आफ्रिकेचे 22 खेळाडू, ऑस्ट्रेलियाचे 21 खेळाडू, वेस्ट इंडिजचे 20 खेळाडू, न्यूझीलंडचे 10 खेळाडू, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचे 8 खेळाडू, आयर्लंडचे 4 खेळाडू, बांगलादेशचे 4 खेळाडू, झिम्बाब्वेचे 2 खेळाडू, नामिबियाचे 2 खेळाडू, नेदरलँड आणि यूएई यांच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आलाय. 


हे देखील वाचा-