अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला. या मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलने संपूर्ण मालिकेत वर्चस्व गाजवलं. अक्षरने 3 कसोटी सामन्यात 27 विकेट घेतल्या. संपूर्ण मालिकेत अक्षरने चार डावात पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला. अक्षर पटेलने त्याच्या शानदार कामगिरीने पदार्पणातील मालिकेतच नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.


भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये अक्षर पटेलने आपली फिरकीची जादू दाखवली. इंग्लंडचे फलंदाज अक्षरसमोर टीकूच शकले नाहीत. अक्षर पटेलने या कसोटी मालिकेदरम्यान चार डावांमध्ये 5 बळी घेऊन नव्या विक्रमाला गवसणी घातली. मालिकेत अक्षरने दुसर्‍या कसोटी सामन्यात पदार्पण केले. यानंतर त्याने मालिकेत एकूण 27 विकेट घेतले. केवळ आर अश्विन त्याच्या पुढे राहिला, ज्याने 32 विकेट घेतल्या. अक्षर पटेलने पदार्पणाच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करत सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम केला. पदार्पण मालिकेत अक्षर पटेलपेक्षा इतर कुठल्याही गोलंदाजाने जास्त विकेट घेतलेल्या नाहीत.


प्रशंसनीय! भारतीय क्रिकेट संघाकडून आणखी एका यशाला गवसणी


अक्षर पटेलच्या आधी कोणत्याही कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर होता. मेंडिसने 2008 मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान एकूण 28 विकेट घेतल्या होत्या. आता अक्षरने मेंडिसला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे.


IND vs ENG, 4th Test Highlights: इंग्लंडला नमवत भारताचा कसोटी मालिकेत दणदणीत विजय


पदार्पण मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज




  • 27 विकेट्स- अक्षर पटेल विरुद्ध इंग्लंड (2020/21)

  • 26 विकेट्स- अजंता मेंडिस विरुद्ध भारत (2008)

  • 24 विकेट्स- अॅलेक बेडसर विरुद्ध भारत (1946)

  • 22 विकेट्स- आर अश्विन विरुद्ध वेस्ट इंडिज (2011/12)

  • 20 विकेट्स- स्टुअर्ट क्लार्क विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2005/06)


Ind vs Eng | शतकी खेळीपासून काही पावलं दूर असतानाच निराश चेहऱ्यानं माघारी परतला वॉशिंग्टन सुंदर


टीम इंडियाने इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पाहुण्या इंग्लंडच्या संघाचा पराभव केला. यासोबतच संघाने कसोटी मालिका 3-1 अशा फरकानं खिशात टाकली. अखेरच्या कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयामुळे भारतीय़ क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. जिथं भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे.