मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडच्या संघाचा चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1नं पराभव केला. या विजयासोबतच वर्ल्ड चँपियनशिपच्या अंतिम फेरीत संघानं स्थान मिळवलं. यासोबतच संघानं आणखी एका यशाला गवसणी घातली. हे यश पाहता सध्या आंतरराष्ट्रीय क्रीडा वर्तुळातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. कारण, भारतीय संघानं आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीच पहिलं स्थान मिळवलं आहे.
परिणामी आता, वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये आता जेव्हा भारतीय संघ जून महिन्यात लॉर्ड्सच्या मैदानात खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा कसोटी क्रिकेटमधील क्रमांक एकचा संघ, अशीच संघाची ओळख असेल. दरम्यान, इंग्लंडला नमवण्यापूर्वी भारतानं ऑस्ट्रेलियात जाऊन थेट यजमानांनाच 2-1 आ फरकानं पराभूत केलं होतं.
IND vs ENG, 4th Test Highlights: इंग्लंडला नमवत भारताचा कसोटी मालिकेत दणदणीत विजय
इथं भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात दमदार झाली. पण, भारतीय संघाने कमालीची कामगिरी करत या मालिकेत विजय मिळवला. रविचंद्रन अश्विनला त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजी अशा परिपूर्ण खेळीसाठी मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर, 3 सामन्यांमध्ये 27 गडी बाद करणाऱ्या अक्षर पटेल यानंही या मालिकेत विशेष छाप सोडली.
Ind vs Eng | शतकी खेळीपासून काही पावलं दूर असतानाच निराश चेहऱ्यानं माघारी परतला वॉशिंग्टन सुंदर
इंग्लंडचा पराभव केला आणि....
तिथं भारतानं पाहुण्यांचा पराभव केला आणि न्यूझीलंडच्या संघाला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. आयसीसी क्रमवारीत भारताकडे सध्या 122 गुण आहेत. तर, न्यूझीलंडच्या खात्यात 118 गुण आहेत. या यादीत 113 गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे, तर 105 गुणांसह चौथ्या स्थानावर इंग्लंडच्या संघाला जागा मिळाली आहे. पाकिस्तान 90 गुणांसह यादीत पाचव्या स्थानावर आहे.