IND vs ENG : भारतीय संघाने अखेरच्या कसोटी सामन्यामध्ये एक संपूर्ण डाव आणि 25 धावांनी पाहुण्या इंग्लंडच्या संघाचा पराभव केला. यासोबतच संघाने कसोटी मालिका 3-1 अशा फरकानं खिशात टाकली. अखेरच्या कसोटी सामन्यात मिळालेल्या विजयामुळे भारतीय़ क्रिकेट संघ वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. जिथं भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे.


चौथा कसोटी सामना हा संघातील युवा खेळाडूंनी खऱ्या अर्थानं गाजवला. फक्त हा सामनाच नव्हे, तर या कसोटी मालिकेमध्ये संघासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचीच उल्लेखनीय कामगिरी यावेळी पाहायला मिळाली. ऋषभ पंत, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर या खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीनं खेळपट्टी गाजवत क्रीडारसिकांच्या मनावर राज्य केलं.


Anupama Parameswaran: कोण आहे अनुपमा परमेश्वरन? टीम इंडियाचा स्टार बुमराह सोबत लग्नाच्या चर्चा?





इंग्लंडच्या संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात इंग्लंडच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात इंग्लंडनं 205 धावा केल्या. पण, भारतीय फलंदाजांनी याचं उत्तर देत 365 धावांसह इंग्लंडवर 160 धावांची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडच्या संघातील सर्व खेळाडू अवघ्या 135 धावांवर तंबूत परतले. या सामन्यात अक्षर पटेल यानं सर्वाधिक 9 गडी बाद केले. तर, अश्विननं 8 गडी बाद केले.


कसोटी मालिकेमध्ये इंग्लंडच्या संघाने 227 धावा करत पहिला सामना जिंकला बोता. पण, दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडला 317 धावांनी पराभूत करत भारतीय संघानं या मालिकेतील आव्हान कायम ठेवलं होतं. तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत सांगावं तर, भारतीय संघानं एक डाव आणि धावांनी सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आणखी एक पान जोडलं.