T20 World Cup 2024 : आयपीएलची रनधुमाळी सुरु असतानाच टी 20 विश्वचषकाच्या चर्चेलाही जोर आला आहे. जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे टी 20 विश्वचषक होणार आहे. त्यासाठी दोन आठवड्यामध्ये टीम इंडियाची निवड होणार आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यामध्ये गेल्या आठवड्यात टी 20 विश्वचषकासंदर्भात बैठक पार पडली. यामध्ये काही खेळाडूंच्या निवडीविषयी सखोल चर्चा झाली. पीटीआयच्या वृत्तानुसार, टी 20 विश्वचषकासाठी 20 जणांच्या चमूची निवड करण्यात आले आहे. यामधील अतिंम 15 खेळाडू विश्वचषकात खेळणार असल्याचं सजतेय. 20 खेळाडूमध्ये आयपीएलमध्ये फ्लॉप कामगिरी करणाऱ्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय राजस्थानच्या रियान पराग याचाही विचार कऱण्यात आला आहे. यशस्वी जायस्वाल, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांना आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करता आलेली नाही, पण 20 जणांच्या चमूमध्ये त्यांची नावेही आहेत.
कोणत्या 20 खेळाडूंची निवड -
फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंचा समावेश असलेल्या 20 जणांचा चमू निवडण्यात आलाय. फलंदाजीबाबात बोलायचं झाल्यास रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. रिपोर्ट्सुनासर, टी 20 विश्वचषकात विराट कोहली आणि रोहित शर्मा सलामीला खेळणार आहे. शुभमन गिल याला बॅकअप सलामी फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात येणार आहे. मध्यक्रममध्ये सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, ऋषभ पंत, केएल राहुल, रियान पराग आणि संजू सॅमसन यांना स्थान दिलेय.
अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा आणि अक्षर पटेल यांना स्थान देण्यात आलेय. फिरकी गोलंदाजामध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आलेय. त्याशिवाय रवि बिश्नोई याचीही निवड करण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह याचं स्थान निश्चित मानले जातेय. त्याच्यासोबत मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंह यांना स्थान देण्यात आलेय.
विकेटकीपर म्हणून ऋषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसन यांचा विचार केला जातोय. यामधील दोन जणांना स्थान मिळेल, असा अंदाज वर्तवला जातोय.
कार्तिकला स्थान नाही -
हैदराबादविरोधात स्फोटक 83 धावांची खेळी करणाऱ्या दिनेश कार्तिकचा टी 20 विश्वचषकासाठी विचार कऱण्यात आला नाही. त्याशिवाय वेगवान गोलंदाजी कऱणाऱ्या मयंक यादव यालाही स्थान देण्यात आले नाही. आर. अश्विन यालाही वगळण्यात आलेय.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेले 20 खेळाडू कोणते ?
रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, केएल राहुल, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, आवेश खान
टी 20 विश्वचषकासाठी भारताचे संभाव्य 15 शिलेदार -
रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन/केएल राहुल, रिंकू सिंह/शिवम दुबे, रवींद्र जडेजा,अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल/रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह