Rishabh Pant Century : इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने 3-1 ने जिंकली. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने 5 विकेट्सनी विजय मिळवला. ज्यामध्ये ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या या दोघांनी केलेल्या भागिरादीमुळेच हा विजय शक्य झालाय ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार शतकामुळे पंतने यंदाच्या वर्षात एकदिवसीय सामन्यांतही आपला झेंडा रोवला आहे.
मागील वर्षी 2020 पासूनच ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. याशिवाय एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांतही पंतची कामगिरी तुफान होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षात ऋषभ पंतने 23 सामन्यातील 26 डावात 988 रन केले आहेत. ऋषभ पंतची फलंदाजीतील सरासरी 44.90 टक्के इतकी असून त्यांचा स्ट्राईक रेट 98.21 इतरा आहे.
ऋषभ पंतने ठोकली तीन शतकं
इंग्लंड दौऱ्यावर ऋषभ पंतने दोन शतकं लगावली आहेत. यावेळी पंतने 146 धावांची एक दमदार खेळी देखील खेळला. या शतकांमुळे ऋषभ पंतने यंदा 2022 या वर्षात तीन शतकं आणि 6 अर्धशतकं लगावली आहेत. विशेष म्हणजे सर्व शतकं ही अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये लगावल्याने पंतवर कौतुकाचा आणखी वर्षाव होत आहे.
पंत-पांड्याची अफलातून भागिदारी
हार्दिक पांड्या ऋषभ पंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं निर्णायक सामन्यात इंग्लंडचा पाच विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची दमछाक झाली. परंतु, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांच्या जोडीनं संघाचा डाव सावरून भारताच्या विजयाचा पाया रचला. भारताकडून ऋषभ पंतनं 113 चेंडूत नाबाद 125 धावांची खेळी केली. तर, हार्दिक पंड्यानं 55 चेंडूत 71 धावांचं योगदान दिलं.
हे देखील वाचा-