England vs India ODI Series: इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवून इतिहास रचला. तब्बल आठवर्षानंतर भारतानं इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली आहे. याआधी महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात भारतानं 2014 मध्ये एकदिवसीय मालिका जिंकली होती. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli) इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंचं कौतूक करणार ट्वीट केलंय. 


इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील फोटो ट्विटवर शेअर करत विराट कोहलीनं लिहिलंय की, "रोमाचंक सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं सामना जिंकला." महत्वाचं म्हणजे, तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतानं इग्लंडला 259 धावांवर रोखलं. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं झटपट चार विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेऊन भारताच्या विजयाचा पाय रचला. अखेर भारतानं पाच विकेट्सनं सामना जिंकला. 


विराट कोहली ट्वीट-




इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला 259 धावांवर गुंडाळलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सुरुवात खराब झाली. परंतु, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्यानं पाचव्या विकेट्ससाठी 133 धावांची भागेदारी करत भारताचा डाव सावरला. अखेर भारतानं पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह भारतानं 2-1 अशी मालिका जिंकली. भारताकडून ऋषभ पंतनं नाबाद 125 खेळी केली. 


हे देखील वाचा-