एक्स्प्लोर

...तर विराट कोहली वर्ल्डकपमधील सामन्यात गोलंदाजी करणार

भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे वेगवान, भुवनेश्वर कुमार हा स्विंग गोलंदाज, हार्दिक पंड्या आणि विजय शंकर सारखे मध्यमगती गोलंदाज असूनही विराट कोहली गोलंदाजीचा सराव करताना दिसल्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत बुधवारी पहिला सामना खेळत आहे. वर्ल्डकपसाठी जो भारतीय संघ निवडण्यात आला आहे, त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा आहे. असे असतानाही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव करत असल्याचे पाहायला मिळाले. सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्तम फलंदाज फलंदाजी सोडून गोलंदाजीचा सराव करतोय, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी हे दोन वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या जोडीला भुवनेश्वर कुमारच्या रुपाने भारताला स्विंग गोलंदाजदेखील मिळाला आहे. हार्दिक पंड्या आणि विजय शंकरसारखे मध्यमगती गोलंदाजही आहेत. सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेले कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजासारखे फिरकीपटूदेखील आहेत. त्यासोबत केदार जाधव आणि रोहित शर्मासुद्धा कामचलाऊ गोलंदाज आहेत. असा गोलंदाजांचा तोफखाना असूनही कोहली गोलंदाजीचा सराव का करतोय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. विराट कोहली हादेखील कामचलाऊ गोलंदाजी करतो, हे अनेकदा आपण पाहिले आहे. भारताकडे रोहित शर्मा हा एक ऑफ स्पिनर (कामचलाऊ) आहे. परंतु भारताला या वर्ल्डकपमध्ये ऑफ स्पिनर गोलंदाजाची गरज भासू शकते. अशा वेळी भारताकडे एखादा पर्याय उपलब्ध असावा, यासाठीच विराट कोहली नेट्समध्ये ऑफ स्पिन गोलंदाजीचा सराव करत असल्याचे बोलले जात आहे. विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजी करत नाही. पंरतु आतापर्यंत कामचलाऊ गोलंदाजी करताना विराटने एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी 4-4 बळी घेतले आहेत. त्यामुळे विराटने वर्ल्डकपमधील एखाद्या सामन्यात गोलंदाजी केली, त्याचबरोबर विकेटही घेतली तर त्याचे नवल वाटायला नको. गोलंदाजीचा सराव करत असतानाचा विराटचा व्हिडीओ पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
ENG vs PAK 3rd Test : नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची लोणावळ्यात कोट्यवधींची खरेदी; एकाचवेळी 3 आलिशान प्रॉपर्टीची खरेदी
सचिन तेंडुलकरची लोणावळ्यात कोट्यवधींची खरेदी; एकाचवेळी 3 आलिशान प्रॉपर्टीची खरेदी
Team India U19 squad Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात तडकाफडकी बदल, एका खेळाडूला बाहेर काढले, नव्या 2 जणांना संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात तडकाफडकी बदल, एका खेळाडूला बाहेर काढले, नव्या 2 जणांना संधी

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Embed widget