England vs India 1st ODI: लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं इंग्लंडला 110 धावांवर रोखलं. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं एकोणीसव्या षटकातच सामना जिंकला. या सामन्यानंतर रोहित शर्मानं त्याच्या हूक आणि पुल शॉट्सबाबत मोठं वक्तव्य केलं. याशिवाय भारतीय गोलंदाज आणि सलामीवीर शिखर धवनच्या फलंदाजीचंही कौतूक केलं. 


रोहित शर्मा काय म्हणाला?
इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, "खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज पाहून आम्ही गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरला. आम्ही सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, ज्यात आम्हाला यश आलं." पुढे रोहित शर्मा म्हणाला की, परिस्थिती कशी आहे? याचा आम्ही विचार करत नाही. आम्ही खेळपट्टी आणि परिस्थिती पाहून गोलंदाजी करतो. टी-20 सामन्यादरम्यान आम्ही पाहिलं की, खेळपट्टी सपाट आहे. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाजा सर्वात जास्त फायदा मिळाला. सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाला सीम आणि स्वींग दोन्ही मिळत होतं. 


रोहितचा आवडतं पुल आण हुक शॉट्स खेळायला
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहत शर्मानं अर्धशतकीय खेळीदरम्यान पाच षटकार मारले. यातील अधिकतर षटकार त्यानं पुल आणि हुक शॉट मारले. याबाबत रोहित शर्मा म्हणाले की, "पुल आणि हुक शॉट खेळण्यात सर्वात अधिक जोखिम आहे. परंतु, मला हे शॉट्स खेळायला आवडतात. जो पर्यंत या शॉट्सवर षटकार लागतील, तोपर्यंत हा शॉट्स खेळत राहणार."


रोहितकडून शिखर धवनचं कौतूक
शिखर धवनसोबतच्या मॅच-विनिंग शतकी भागीदारीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, “ धवनसोबत मी खूप क्रिकेट खेळलो आहे. आम्ही एकमेकांना खूप चांगले समजतो. डावाच्या पहिल्या चेंडूवर आमच्यात गैरसमज झाला. तो बऱ्याच दिवसांनी एकदिवसीय क्रिकेट खेळत आहे. तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्या संघात सामील झाल्यानं काय फायदा होईल? हे आपल्या सर्वांना माहीत आहे."


हे देखील वाचा-